आजकाल घर किंवा जमीन खरेदी करणे सामान्य लोकांच्या आवाक्यबाहेर गेले आहे. कारण प्रॉपर्टीच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. खरेदी करणे दूरच भाड्याने खोली घेणेही मोठे जिकिरीचे झाले आहे. दिल्ली सारख्या शहरात भलेही सर्व गटातील लोक राहत असतील मात्र मुंबईत राहणे कोणाचीही ऐपत नाही. येथे घर खरेदी करणे सोडा भाड्याने घर घेण्यासाठीही लाखो रुपये वेतन घेणाऱ्या लोकांची परिस्थिती कठीण होऊन जाते. सोशल मीडियावर सध्या अशीच एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये एका तरुणीने म्हटले आहे की, मुंबईमध्ये एका सामान्य माणसाला वन बीएचके फ्लॅट भाड्याने घेणे किती मुश्किल आहे.
भारताची आर्थिक राजधानी असलेली मुंबईतील घराचे भाडे गगनाला भिडले आहे. शहरातील अनेक फ्लॅट लहान असले तरी भरमसाठ किमतीचे टॅग घेऊन येतात. हे लक्षात घेऊन मुंबईतील एका वकिलाने लोकांना शहरात भाड्याने न राहण्याचा सल्ला दिला.
या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "१ बीएचके ५०-७० हजार का मिल रहा है मुंबई में. माँ बाप से बना के रखो भाई. कोई जरुरत नहीं है इंडिपेंडेंट होने के लिए घर से भागने की [1 बीएचके मुंबईत ५०-७० हजारांना मिळत आहे. आई-वडिलांशी चांगले संबंध ठेवा. स्वतंत्र होण्यासाठी घरातून पळून जाण्याची गरज नाही,' असे @kebabandcoke हँडलवरून विटा या एक्स युजरने पोस्ट केली आहे.
ही पोस्ट ८ जून रोजी एक्सवर शेअर करण्यात आली होती. त्यानंतर या गाण्याला दीड लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून हा आकडा अजूनही वाढतच चालला आहे. काहींनी मुंबईतील भाड्याबाबत टिप्पणी विभागात अविश्वास व्यक्त केला, तर काहींनी थोडे कमी भाडे असलेल्या भागांची सूचना केली. काही लोकांनी तर मुंबईच्या भाड्याच्या परिस्थितीची तुलना दिल्लीशी केली.
यावर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिली आहे. एका युजरने म्हटले आहे की, हे खरे आहे, महागाई खूप वेगाने पगारापेक्षा जास्त वेगाने वाढत आहे. कर्जाच्या मोठ्या ओझ्याशिवाय घर, चांगली आरोग्य सेवा आणि दर्जेदार शिक्षण मिळणे अनेकांना अशक्य स्वप्नासारखे वाटते.
आणखी एकाने म्हटले आहे की, हे ७० हजार भाडे आहे की ईएमआय? तसे झाले तर मलाही आश्चर्य वाटणार नाही. माझा मित्र अंधेरीतील थ्री बीएचकेसाठी एक लाख रुपये भाडे देत आहे.
तिसऱ्या युजरने दावा केला आहे की, "दिल्लीत या आणि फक्त ९-१० हजारात सुसज्ज २ बीएचके फ्लॅट भाड्याने घ्या. चौथ्या युजने कमेंट केली, "अगदी खरं आहे. भाडं खूप जास्त आहे.
"मी यापूर्वी २ बीएचकेसाठी ८५ हजार रुपये दिले आहेत, आता २ बीएचकेसाठी ४८ हजार रुपये दिले आहेत. शक्य असेल तर लोकेशन दलण्याचा प्रयत्न करा,' असे पाचव्याने सुचवले आहे.
संबंधित बातम्या