Worli Hit and Run: वरळीत मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या महिलेला भरधाव कारने चिरडले
Worli Accident: वरळी कार अपघातात जखमी झालेल्या महिलेचा उपचारदरम्यान मृत्यू झाला आहे.
Worli Car Accident: वरळी सी फेस जवळ एका भरधाव कारने मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या महिलेल्या चिरडले. या अपघातात महिलेचा उपचारदरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना रविवारी (१९ मार्च २०२३) सकाळी घडली. याप्रकरणी वरळी पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेतले असून पुढील तपास करीत आहेत.
ट्रेंडिंग न्यूज
मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिला सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेली असताना भरधाव कारने तिला चिरडले. या अपघातात महिला गंभीर जखमी झाली. तिला ताबडतोब नायर रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. या अपघातात कारचालकही जखमी झाल्याचे माहिती मिळत आहे. ज्यावेळी हा अपघात घडला तेव्हा कारचा वेग १२० किलो प्रतितास इतका होता, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. महिलेल्या चिरडल्यानंतर कार रस्त्याशेजारी असलेल्या कठड्याला धडकली. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे.
याप्रकरणी पोलिसांनी कारचालकाला ताब्यात घेतले असून पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. तसेच हा अपघात कशामुळे झाला? याचाही पोलीस तपास करीत आहेत.
पुणे: मॉर्निंग वॉकला गेलेल्या व्यक्तीला भरधाव कारने चिरडले
पिंपरी-चिंचवडच्या काळेवाडी बीआरटी रोड येथे दोन आठवड्यापूर्वी भरधाव कारने मॉर्निंग वॉकला गेलेल्या एका व्यक्तीला अर्धा किलोमीटर फरफटत नेले. या अपघातात संबंधित व्यक्ती गंभीर जखमी झाल्याने त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.