Viral Video: समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांची गुंडगिरी; गटार आणि कचरासंबंधित तक्रार घेऊन गेलेल्या महिलेला मारहाण
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Viral Video: समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांची गुंडगिरी; गटार आणि कचरासंबंधित तक्रार घेऊन गेलेल्या महिलेला मारहाण

Viral Video: समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांची गुंडगिरी; गटार आणि कचरासंबंधित तक्रार घेऊन गेलेल्या महिलेला मारहाण

Nov 08, 2024 03:31 PM IST

Abu Azmis Associates Attacked Women: मुंबईतील गोवंडी परिसरातील गटार आणि कचरासंबंधित तक्रार घेऊन गेल्यानंतर समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा दावा एका महिलेने केला आहे.

 समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून महिलेला मारहाण
समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून महिलेला मारहाण

Mumbai Woman Claims SP Leader Abu Azmis Associates Attacked Her: महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका तोंडावर मानखुर्द येथील शिवाजी नगर मतदारसंघातून धक्कादायक माहिती समोर आली. गोवंडीतील रफिक नगर भागात कचरा आणि ओसंडून वाहणाऱ्या गटारांच्या समस्यांबाबत तक्रार करण्यासाठी समाजवादी पक्षाच्या कार्यालयात गेलेली महिला आणि तिच्या सरकाऱ्यांना मारहाण करण्यात आली. संबंधित महिलेले एका व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला आहे. तसेच अबू आझमींच्याविरोधात स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

व्हिडिओत महिलेच्या अंगावरील कपडे फाटलेले दिसत आहेत. सपा नेते फहाद आझमी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तिच्यावर आणि तिच्यासोबत असलेल्या लोकांवर हल्ला केल्याचे तिने म्हटले आहे. महिलेने असाही दावा केला आहे की, मारहाणीदरम्यान त्यांच्या अंगावरील कपडे फाटले आहेत. त्यांच्यापैकी एका तरुणाच्या डोक्याला दुखापत झाली असून रक्तस्त्राव होत असल्याचे दिसून येत आहे. व्हिडिओच्या शेवटी या घटनेबाबत पोलिसांकडे तक्रार नोंदवण्यात येईल, असेही त्यांनी म्हटले आहे. या व्हिडिओवर समाजवादी पक्षाने कोणतेही निवेदन जारी केलेले नाही आणि स्थानिक पोलिसांनीही अद्याप या प्रकरणावर अधिकृतपणे भाष्य केलेले नाही.  मात्र, या घटनेमुळे विरोधकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. बहुतेक लोकांनी अबू आझमी यांच्याविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

अर्ध्याहून अधिक लोकसंख्या मुस्लिम असलेल्या या जागेवर चुरशीची लढत होण्याची अपेक्षा आहे. सपाचे प्रदेशाध्यक्ष आणि विद्यमान आमदार अबू आझमी आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक यांच्यात मुख्य लढत आहे. कनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे तिसरे उमेदवार सुरेश पाटील हे देखील या मतदारसंघातून उभे राहिले आहेत.

महाराष्ट्रात येत्या २० नोव्हेंबर २०२४ ला विधानसभेसाठी मतदान होणार आहे. तर, २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. राज्यात महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात मुख्य लढत आहे.  लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले होते. मात्र, विधानसभा निवडणुकीत जनता कोणाच्या बाजूने कौल देणार हे महत्त्वाचे ठरणार आहे.  

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर