मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai: कुर्ल्यात सुटकेसमध्ये आढळलेल्या महिलेच्या मृतदेहाचा उलगडा; हत्येचं कारण धक्कादायक!

Mumbai: कुर्ल्यात सुटकेसमध्ये आढळलेल्या महिलेच्या मृतदेहाचा उलगडा; हत्येचं कारण धक्कादायक!

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Nov 21, 2023 01:06 PM IST

Woman Body Found Inside Suitcase In Kurla: मुंबईच्या कुर्ल्यात एका महिलेचा मृतदेह सुटकेसमध्ये आढळल्याने खळबळ माजली.

crime. (Representative use)
crime. (Representative use) (HT_PRINT)

Mumbai Kurla Murder News: मुंबईच्या कुर्ला येथील एसटी रोड शांती नगर समोरील मेट्रोच्या कामाच्या ठिकाणी रविवारी मध्यरात्री एका सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ माजली. याप्रकरणी पोलिसांनी ३०२ या कलमान्वये गुन्हा नोंदवत पुढील तपासाला सुरुवात केली. त्यावेळी मृत महिला लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. दरम्यान, पोलिसांनी मृत महिलेच्या लिव्ह इन पार्टनरकडे घातपाताच्या अनुषंगाने कसून चौकशी केली असता धक्कादायक माहिती उघड झाली. त्यानेच चारित्र्याच्या संशयावरुन या महिलेची हत्या केल्याची कबूली दिली.

ट्रेंडिंग न्यूज

कुर्ल्यातील रविवारी रात्री १२.३० वाजताच्या सुमारास एक संशयित सुटकेस सापडल्याचा फोन पोलिसांना आला. पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन बॅगेची तपासणी केली असता त्यांना त्यात महिलेचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवून पुढील तपासाला सुरुवात केली. त्यावेळी संबंधित महिला धारावी येथील रहिवासी असून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचे पोलिसांना समजले. याप्रकरणी पोलिसांनी महिलेच्या पार्टनरला अटक केली. चारित्र्याच्या संशयावरून महिलेची हत्या करण्यात आली, असा पोलिसांना संशय आहे. याप्रकरणी पोलीस हत्येचे नेमके कारण काय? याचा तपास करीत आहे.

महत्त्वाचे म्हणजे, गेल्या काही वर्षांत लिव्ह इन रिलेशनशिपमधील हत्येच्या घटना वाढत आहेत. लिव्ह इन रिलेशनशिपमधला वाद विकोपाला गेल्याने जोडीदाराची हत्या करण्यात आल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार, गेल्या दोन वर्षात देशभरात महिला हिंसाचाराच्या घटनेत ३८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. या हिंसाचारात बळी पडणाऱ्या महिलांमध्ये ११ टक्के संख्या लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरुणींची आहे.

हत्येसारख्या गंभीर गुन्ह्यांबरोबरच हत्येचा प्रयत्न, जबर मारहाण, फसवणूक यांसारखे प्रकार लिव्ह इन रिलेशनशिपच्या प्रकारातून समोर येत आहेत. लिव्ह इन रिलेशनशिप राहण्यासाठी अनेक जोडप्यांची मानसिक तयारी नसते. अनेकदा आपल्या पार्टनरला एकमेकांच्या सवयी आवडत नाहीत. ज्यामुळे वाद निर्माण होतो.काही वेळा हे वाद इतके विकोपाला जातात की, त्यातून गंभीर गुन्हे घडतात.

WhatsApp channel

विभाग