मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Dadar Sex Racket : मुंबईत दादर परिसरात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; एका महिलेला अटक, सहा जणांची सुटका

Dadar Sex Racket : मुंबईत दादर परिसरात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; एका महिलेला अटक, सहा जणांची सुटका

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Apr 15, 2024 04:31 PM IST

Mumbai Dadar Sex Racket Busted: मुंबई येथील दादरमध्ये सेक्स रॅकेट सुरू असल्याची मुंबई पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी संबंधित ठिकाणार छापा टाकला.

मुंबईच्या दादर येथील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात मुंबई पोलिसांना यश आले.
मुंबईच्या दादर येथील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात मुंबई पोलिसांना यश आले. (HT)

Mumbai Sex Racket News: मुंबईच्या दादर येथील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेट पर्दाफाश करण्यात मुंबई पोलिसांना यश आले. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने शनिवारी सापळा रचून एका ३६ वर्षीय महिलेला अटक केली. तर, सहा जणांची सुटका केली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. या घटनेने पोलिसांत एकच खळबळ माजली. स्थानिक लोकांकडून दोषींविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मिळालेल्या माहितीनुसार, सुवर्णा पगारे असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. आरोपी महिला मूळची रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील आहे. पगारे वेश्याव्यवसायासाठी पुरुष ग्राहकांना महिला पुरवत असे. वेशाव्यवसाय चालवणाऱ्यांमध्ये आणखी दोन महिलांचा समावेश आहे, ज्यांचा पोलीस शोध घेत आहे.

Salman Khan : सलमानच्या घरावर हल्ला करणाऱ्यांनी वापरलेली बाईक कुणाची? तपासात पुढे आली महत्वाची माहिती

सापळा रचून आरोपीला रंगेहाथ पकडले

पोलीस निरीक्षक अनिता कदम यांना दादरमध्ये वेश्याव्यवसाय सुरु असल्याची माहिती मिळाली. यानंतर त्यांनी दादरमधील भोईवाडा पोलिसांशी हातमिळवणी करून लगेच कारवाईला सुरुवात केली. आरोपींना रंगेहाथ पकडण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला. पोलिसांनी दोन बोगस ग्राहकांना आरोपी महिलेकडे पाठवले. बोगस ग्राहकांनी आरोपीकडे महिलांची उपलब्धता आणि किंमतीबद्दल विचारणा केली. यानंतर आरोपी महिलेला दादर येथील एका रेस्टॉरंटमध्ये बोलवण्यात आले, जिथे ती सहा महिलांसह पोहोचली. यानंतर बोगस ग्राहकांनी आरोपीला पेसै दिले. यावेळी पोलिसांनी तिला पैसे स्वीकारताना पकडले.

Sangli Superstition News : झाडाला आठवडाभर उलटं लटकवलं; अखेर तडफडून झाला मृत्यू, सांगलीत अघोरी प्रकाराने खळबळ

असे चालवायचे सेक्स रॅकेट

तपासादरम्यान वेश्याव्यवसायात आणखी दोन महिलांचा समावेश असल्याची माहिती मिळाली. हॉट्सअप कॉलद्वारे ग्राहकांशी पैशांची बोलणी करून त्यांना फोटो पाठवली जात असे. यानंतर ग्राहकाला निवड करण्यास सांगून त्यांच्याकडून पैसे घेतले जायचे. यानंतर महिलांना ग्राहकांच्या इच्छित ठिकाणी पाठवले जायचे.

सहा महिलांची सुटका

मुंबई पोलीस गुन्हे शाखेने कळवा, गोवंडी, कर्जत, मुलुंड, चुनाभट्टी आणि शिवडी या भागातील सहा महिलांची सुटका केली. भोईवाडा पोलिस ठाण्यात तीन महिलांविरुद्ध कलम ३७० (१) (शोषणाच्या उद्देशाने तस्करी), ३७० (३) (एकाहून अधिक व्यक्तींची तस्करी), ३४ (सामान्य हेतू) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात सहभागी असलेल्या अन्य दोन महिलांचा शोध सुरू आहे.

IPL_Entry_Point