Viral Video: मुंबईतील जुहू येथे महिलेला पाहून तरुणानं काढली पँट, व्हिडिओ व्हायरल
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Viral Video: मुंबईतील जुहू येथे महिलेला पाहून तरुणानं काढली पँट, व्हिडिओ व्हायरल

Viral Video: मुंबईतील जुहू येथे महिलेला पाहून तरुणानं काढली पँट, व्हिडिओ व्हायरल

Published Jul 21, 2024 05:57 PM IST

Mumbai Juhu Viral Video: मुंबईतील जुहू परिसरात एका तरुणाने महिलेसोबत गैरवर्तन केले, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मुंबईतील जुहू येथे महिलेचा विनयभंग
मुंबईतील जुहू येथे महिलेचा विनयभंग (HT)

Mumbai News: देशात महिलांवर होणाऱ्या अत्यचाराच्या घटनेत लक्षनीय वाढ झाली. बहुतांश ठिकाणी महिलांसाठी रात्रीचे घराबाहेर पडणे सुरक्षित नाही. मात्र, आता दिवसाढवळ्या देखील महिलांचे घराबाहेर पडणे अवघड झाले. अशीच एक घटना मुंबईतील जुहू येथे घडली. एका तरुणाने माझ्यासमोर येऊन स्वत:ची पँट काढल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. या महिलेने संबंधित तरुणाचा चेहरा मोबाईच्या कॅमेऱ्यामध्ये कैद करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने लगेच घटनास्थळावरून पळ काढला.या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला.

@viyaadoshi या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की,एक तरुण शॉर्ट्स आणि बनियान घालून फूटपाथवरून धावताना दिसत आहे. तर, महिला त्याला हाक मारताना दिसत आहे. हा व्हिडिओ जुहूच्या जानकी कुटीर भागातील असल्याचा दावा केला जात आहे. या व्हिडिओत संबंधित महिलेसोबत कोणतेही गैरवर्तन करताना दिसले नाही. परंतु, पीडित महिलेने मुंबई पोलिसांना टॅग करत अशी माहिती दिली आहे की, ‘जुहू येथील जानकी नगर येथे एका तरुणाने मला हाक मारली आणि स्वत:ची पँट काढली. हा प्रकार आज सकाळी ८.५५ मिनिटांनी घडला. असे तिसऱ्यांदा माझ्यासोबत झाले. या भागात सुरक्षा वाढवण्याची विनंती करते. कारण याआधीही अनेक महिलांसोबत असाच प्रकार घडल्याचे समजत आहे.मी निर्भया पथकाला फोन करण्याचा प्रयत्न केला पण माझ्या कॉलला प्रतिसाद मिळाला नाही. कृपया मदत करा.’

मुंबई पोलिसांनी संबंधित महिलेने केलेल्या पोस्टची दखल घेतली आणि तिला सविस्तर माहिती देण्याची विनंती केली. लवकरच याप्रकरणातील आरोपी किंवा महिलांसोबत अशाप्रकारचे कृत्य करणाऱ्यांना धडा शिकवतील, अशी अपेक्षा आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

मुंबईहून माथेरानमध्ये फिरायला गेलेल्या मुलीवर बलात्कार

मुंबईहून मित्रांसोबत फिरायला गेलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी २२ वर्षीय तरुणाला अटक केली असून इतर दोन जणांचा शोध सुरू आहे. पीडित मुलगी १२ जुलै २०२४ रोजी मित्रांसोबत फिरायला गेली होती. तेव्हाच तिच्यासोबत हा प्रकार घडला. मात्र, पीडित मुलीने हा संपूर्ण प्रकार पालकांपासून लपवून ठेवला. काही दिवसांपूर्वी मुलीवर झालेल्या अत्याचारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण प्रकार उघडकीस आला.

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर