Mumbai Rape News: मुंबईतील वांद्रे टर्मिनस येथे लांब पल्ल्याच्या रेल्वेच्या रिकाम्या डब्यात एका महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी एका हमालाला अटक करण्यात आली. ही घटना शनिवारी (१ फेब्रुवारी) रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. मात्र, या घटनेने लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
एका पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मध्यमवयीन महिला आणि तिचा मुलगा शनिवारी रात्री हरिद्वारहून वांद्रे टर्मिनस येथे उतरले. मुलगा काही कामानिमित्त स्थानकाबाहेर गेला. त्यावेळी पीडित महिला थोडा वेळ प्लॅटफॉर्मवर झोपली. मात्र, झोपेवर नियंत्रण मिळवता न आल्याने ही महिला समोर उभ्या असलेल्या एका एक्स्प्रेस ट्रेनच्या रिकाम्या डब्यात जाऊन झोपली. त्याठिकाणी काम करत असलेल्या आरोपी हमालाने तिला पाहिले. महिला एकटीच असल्याचा आणि रेल्वे स्थानकावर कोणीच नसल्याचा गैरफायदा घेत हमाल डब्यात शिरला आणि तिच्यावर बलात्कार केला. या घटनेनंतर हमाल घटनास्थळावरून पळून गेला. महिलेचा मुलगा परत आल्यानंतर तिने आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार त्याला सांगितला.
यानंतर पीडित महिलेने वांद्रे जीआरपी स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. रेल्वे पोलिसांनी पोर्टरचा शोध घेण्यासाठी अनेक सर्व्हेलन्स कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले आणि नंतर त्याला अटक केली. वांद्रे टर्मिनसवर उतरल्यानंतर ही महिला दुसऱ्या ट्रेनमध्ये का शिरली? याचा शोध पोलीस तपास करीत आहेत. आरोपी हमालविरोधात भारतीय न्याय संहितेनुसार बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.
नवी मुंबई शहरातील रेल्वे स्थानकात काही दिवसांआधी बेवारस अवस्थेत १२ वर्षांच्या मुलीवर बालात्कार झाल्याचे तपासात निष्पन्न झाले. याप्रकरणी वाशी रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी आणि तिच्या कुटुंबाचा शोध सुरू आहे.
नवी मुंबईतील घणसोली रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्मवर सोमवारी ही मुलगी मृतावस्थेत आढळून आली. गस्तीवर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी तिच्याकडे चौकशी केली. मात्र, ती आपले नाव सांगू शकली नाही किंवा स्वत:बद्दल किंवा तिच्या कुटुंबाबद्दल इतर कोणतीही माहिती देऊ शकली नाही, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश शिंदे यांनी दिली.
त्यानंतर मुलीला वैद्यकीय चाचणीसाठी नेण्यात आले, ज्यात तिच्यावर बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले असून, अल्पवयीन मुलगी गुन्ह्याबाबत कोणतीही माहिती देऊ शकली नाही. कलम ६५ (१) (बलात्कार), ११५ (२) (स्वेच्छेने इजा पोहोचविणे) आणि ३ (५) (सर्वांच्या समान हेतूने अनेक ांनी केलेले गुन्हेगारी कृत्य) अन्वये अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधित बातम्या