Western Railway: पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक; पण सकाळी कामाधंद्याला जाणाऱ्या लोकांचे होतायेत हाल!
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Western Railway: पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक; पण सकाळी कामाधंद्याला जाणाऱ्या लोकांचे होतायेत हाल!

Western Railway: पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक; पण सकाळी कामाधंद्याला जाणाऱ्या लोकांचे होतायेत हाल!

Jan 25, 2025 01:26 PM IST

Western Railway Mega Block: पश्चिम रेल्वेने माहीम आणि वांद्रे मार्गावरील स्थानकांदरम्यान पुलाच्या पुनर्बांधणीसाठी तीन दिवसांचा मेगाब्लॉक जाहीर केला आहे.

पश्चिम रेल्वेच्या जम्बो ब्लॉकमुळे प्रवाशांचे हाल!
पश्चिम रेल्वेच्या जम्बो ब्लॉकमुळे प्रवाशांचे हाल!

Mumbai Local News: पश्चिम रेल्वेने माहीम आणि वांद्रे मार्गावरील स्थानकांदरम्यान पुलाच्या पुनर्बांधणीसाठी काल रात्रीपासून तीन दिवसांचा रात्रकालीन जम्बो मेगाब्लॉक जाहीर केला आहे. हा मेगाब्लॉक रात्री ११ ते सकाळी ८.३० वाजेपर्यंत असेल, अशी माहिती पश्चिम रेल्वेने आधीच दिली आहे. मात्र, या रात्रकालीन ब्लॉकमुळे सकाळी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत, ज्याचा व्हिडिओ पीटीआय वृत्त संस्थेने ट्वीट केला आहे.

पश्चिम रेल्वेने २४, २५ आणि २६ जानेवारी रोजी जम्बो मेगा ब्लॉक घेतला आहे. पश्चिम रेल्वेने माहीम आणि वांद्रे मार्गावरील स्थानकांदरम्यान पुलाच्या पुनर्बांधणीसाठी हा जम्बो मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. हा रात्रीकलीन मेगाब्लॉक असेल आणि सकाळी सात वाजेपर्यंत लोकल सेवा पूर्ववत होईल,असे रेल्वेने अधिकृतपणे सांगितले होते.

दरम्यान, १८८८ मध्ये बांधलेला लोखंडी स्क्रू पाइल रेल्वे पूल काँक्रीटच्या खांबांनी बदलला जाईल. पश्चिम रेल्वेचे अभियंते या पुलाच्या दक्षिणेकडील भागाची पुनर्बांधणी करतील. २४-२५ जानेवारीच्या रात्री अप आणि डाऊन स्लो मार्ग रात्री ११ ते सकाळी ८:३० वाजेपर्यंत आणि डाऊन जलद मार्ग दुपारी १२:३० ते सकाळी ६:३० वाजेपर्यंत ब्लॉक केले जातील. २५-२६ जानेवारी रोजी अप आणि डाऊन स्लो आणि डाऊन जलद मार्ग रात्री ११ ते सकाळी ८:३० वाजेपर्यंत आणि अप जलद मार्ग रात्री ११ ते सकाळी ७:३० वाजेपर्यंत ब्लॉक केले जातील, असे रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले.

पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक म्हणाले की, ‘शुक्रवार/शनिवार (२४-२५ जानेवारी) १२७ रेल्वे सेवा रद्द केल्या जातील आणि ६० सेवा अंशतः रद्द केल्या जातील. शनिवार/रविवार (२५-२६ जानेवारी) रोजी १५० सेवा रद्द केल्या जातील आणि ९० सेवा अंशतः रद्द केल्या जातील.’

‘या’ एक्स्प्रेस गाड्या रद्द

-१२२२७ मुंबई सेंट्रल-इंदूर दुरांतो एक्सप्रेस (२५ जानेवारी २०२५)

-१२२६८ हापा-मुंबई सेंट्रल दुरांतो एक्सप्रेस (२६ जानेवारी २०२५)

-०९०५२ भुसावळ-दादर स्पेशल (२५ जानेवारी २०२५)

-१२२६७ मुंबई सेंट्रल-हापा दुरांतो एक्सप्रेस (२५ जानेवारी २०२५)

-१२२२८ इंदूर-मुंबई सेंट्रल दुरांतो एक्सप्रेस (२६ जानेवारी २०२५)

-१९००३ दादर-भुसावळ खान्देश एक्सप्रेस (२६ जानेवारी २०२५)

-१९०१५ दादर-पोरबंदर सौराष्ट्र एक्सप्रेस (२६ जानेवारी २०२५)

-२२९४६ ओखा-मुंबई सेंट्रल सौराष्ट्र मेल (२५ जानेवारी २०२५)

-१२९२७ दादर-एकता नगर सुपरफास्ट एक्सप्रेस (२५ जानेवारी २०२५)

-१२९०२ अहमदाबाद-दादर गुजरात मेल (२५ जानेवारी २०२५)

-५९०२४ वलसाड-मुंबई सेंट्रल पॅसेंजर (२६ जानेवारी २०२५)

-५९०४५ मुंबई सेंट्रल-वापी पॅसेंजर (२६ जानेवारी २०२५)

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर