Mumbai Local Updates: गोरेगाव आणि कांदिवली दरम्यान 6व्या मार्गाच्या बांधकामासाठी पश्चिम रेल्वेवर शनिवारी मध्यरात्रीपासून दहा तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे मुंबई लोकल सेवेवर परिणाम होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जवळपास ७० गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात येणार आहे. तर, ५० हून अधिक गाड्या रद्द होण्याची शक्यता आहे.
शनिवारी मध्यरात्री १२.०० वाजल्यापासून गोरेगाव आणि कांदिवली दरम्यान १० तासांचा मेगाब्लॉक असेल. हा मेगाब्लॉक रविवारी सकाळी १०.०० वाजेपर्यंत असेल. यामुळे मुंबई लोकलच्या वाहतुकीवर परिणाम होईल, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिली.
गोरेगाव आणि बोरिवली स्थानकांदरम्यान सर्व डाऊन धीम्या मार्गावरील गाड्या पाचव्या मार्गावर धावतील आणि प्लॅटफॉर्मच्या अनुपलब्धतेमुळे या गाड्या राम मंदिर, मालाड आणि कांदिवली स्थानकावर थांबणार नाहीत.
याशिवाय, काही चर्चगेट-बोरिवली धीम्या गाड्या गोरेगाव स्थानकावर खंडित केल्या जातील. या ब्लॉक कालावधीत अप आणि डाऊन मेल/एक्स्प्रेस गाड्यांना अंदाजे १० ते २० मिनिटे उशिराने धावतील.
बदलापूर रेल्वे स्थानकावर व्यावसायिक वैमनस्यातून एका व्यक्तीने आपल्या रिव्हॉल्व्हरमधून दोन जणांवर दोन गोळ्या झाडल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. मध्य रेल्वे मार्गावरील उपनगरीय स्थानक प्रवाशांनी खचाखच भरले असताना सायंकाळी सहाच्या सुमारास प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर ही घटना घडली, अशी माहिती रेल्वे पोलिसांनी दिली. हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आणि काही मिनिटांतच त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.याप्रकरणी विकास नाना पगारे (वय, २५) याला अटक करण्यात आली. तर, या घटनेत शंकर संसारे असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. संसारे यांना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या गोळीबाराचा संबंध परिसरातील टीव्ही केबल व्यवसायाची असल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे.