Mumbai Weather update : राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठा बदल होत आहे. गेल्या आठवड्यात मुंबईकर उकड्याने हैराण झाले होते. मात्र, गायब झालेली थंडी पुन्हा परत आली आहे. मुंबईत तापमानात मोठी घट झाली आहे. रविवारी सांताक्रूझ येथे सर्वात कमी तापमानाची नोंद झाली. १५ अंश डिग्री सेल्सिअस तापमानात नोंदवल्या गेले. तर कुलाबा येथे १९.५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. दरम्यान, पुढील आठवडा भर पहाटे आणि संध्याकाळी नागरिक ही थंडी अनुभवणार आहेत.
राज्यात आज विदर्भ मराठवाड्यात अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता आज आहे. तसेच राज्यात बहुतांश भगात ढगाळ हवामान देखील राहणार आहे. मुंबईत गेल्या आठवड्यात तापमानात मोठी वाढ झाली होती. उकड्याने सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले होते. मात्र, ही थंडी आता पुन्हा परतली आहे. मुंबईत पहाटे आणि रात्री थंडीत वाढ झाली आहे.
रविवारी सांताक्रूझ येथे १५ डिग्री तपमानांची नोंद झाली. शनिवारच्या तुलनेत ही तापमान २.६ ने कमी होते. तर कुलाबा येथे किमान तापमान शनिवारपेक्षा १.७ अंशांनी घट नोंदवल्या गेली. दरम्यान, पुढील आठवड्यापर्यंत ही तापमानात कायम राहणार आहे. असे असले तरी दुपारी मात्र, तापमानात वाढलेले राहणार आहे. पहाटे पडत असलेल्या थनदीमुळे मुंबईकर सुखावले असले तरी दुपारी मात्र, कमाल तापमान ही ३४ ते ३५ अंशांदरम्यान राहणार आहे.
दरम्यान, कोकणात देखील कमी तपमानाची नोंद झाली आहे. रत्नागिरी येथे १६.८ एवढे कमी तापमान नोंदवले गेले. तर, नाशिक, जळगाव, पुणे येथेही किमान तापमानात घट झाली. पुण्यात रविवारी सकाळी शिवाजीनगर येथे १० अंश सेल्सिअस तपमानची नोंद झाली. तर जळगाव येथे १२ तर नाशिक येथे १०.२ नोंद झाली.