मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai weather update : मुंबईकर गारठले! तापमानात मोठी घट; पुढील काही दिवस थंडीचे

Mumbai weather update : मुंबईकर गारठले! तापमानात मोठी घट; पुढील काही दिवस थंडीचे

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jan 16, 2024 11:07 AM IST

Mumbai weather update : मुंबईत दोन दिवसांपासून गारठा अनुभवायला मिळतोय. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे तापमानात मोठी घट झाली आहे. मुंबईत सोमवारी १६ डिग्री सेल्सिअस तापमानची नोंद झाली.

Mumbai weather update
Mumbai weather update

Mumbai weather update : उत्तरेकडे आलेली थंडीची लाट आणि वेस्टर्न डिस्टबंन्समुळे मुंबईत तापमानात घट झाली आहे. सकाळी हवेत गारवा वाढला आहे. तर सध्याकाही देखील तापमानात घट झाल्याची अनुभूती नागरिकांना येत आहे. मुंबईत सोमवारी आणि मंगळवारी तापमानात १६ डिग्री सेल्सिअस नोंदवल्या गेले. दरम्यान, पुढील काही दिवस थंडीत वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

CTA icon
तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

Nagpada Police Suicide : नागपाडा रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन पोलिसाची आत्महत्या

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पश्चिमी हिमालयावर पश्चिमी विक्षोभाचा परिणाम वाढला आहे. यामुले उत्तर भारतात गारठा वाढला आहे. सध्या सध्या राज्यावर कोणतीही वेदर सिस्टिम कार्यकरत नसली तरी यामुळे थंडीत वाढ होणार आहे. राज्यातील हवामान हे कोरडे राहणार असून आकाश निरभ्र राहणार आहे. पुढील आठवडण्यात राज्यात किमान तापमानात तीन ते चार डिग्री सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. तर कमाल तापमानात फारसा बसल होणार नाही.

Chhatrapati Sambhaji Maharaj : रायगडावर हर्ष दाटला! शेतकऱ्याच्या हस्ते पार पडणार शंभूराजेंचा राज्याभिषेक सोहळा

दरम्यान, मुंबईचे तापमान देखील पुढील काही दिवस सामान्य तापमानापेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे, सकाळचे तापमान सोमवारी १७ डिग्री सेल्सिअसच्या खाली होते. तर मंगळवारी देखील तापमान १६ डिग्री सेल्सिअस नोंदवल्या गेले. हिमालयातून मुंबईवर उत्तरेकडील थंड वारे वाहत असल्यामुळे गारठा वाढला आहे.

दरम्यान, राज्यात सर्वाधिक थंड तापमान नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे नोंदवले गेले. निफाडचे तापमान हे ९ डिग्री सेल्सिअस एवढे होते. तर पुण्याच्या तापमानात देखील मोठी घट पाहायला मिळाली. पुण्यात सकाळी आणि रात्री थंडी तर दिवसा उन असे वातावरण नागरीक अनुभवत आहेत. मुंबईत पुढील १० दिवस सकाळी आणि रात्री थंड हवामान राहणार आहे.

जळगावात किमान ९.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. त्या खालोखाल औरंगाबादमध्ये १०.२, नाशिकमध्ये ११.१, नगरमध्ये ११.५ आणि यवतमाळमध्ये १२.० अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. विदर्भात किमान तापमान सरासरी १३.०, मराठवाड्यात १४.०, मध्य महाराष्ट्रात १३.० आणि किनारपट्टीवर २०.० अंश सेल्सिअस राहिले.

WhatsApp channel