Mumbai Weather Updates: भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार शनिवारी मुंबई शहर आणि उपनगरात अंशत: ढगाळ वातावरण असेल. मुंबईतील तापमान आज किमान तापमान २८ अंश सेल्सिअस ते कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअसपर्यंत आहे. दिवसभर पारा ३०.२ अंश सेल्सिअसच्या आसपास असेल. पश्चिम-वायव्य दिशेकडून वारे ५.६ किमी/ताशी स्थिर गतीने वाहण्याची अपेक्षा आहे. सूर्य सकाळी ०६:०१ वाजता उगवला आणि ०७:१० वाजताच्या सुमारास मावळेल असा अंदाज आहे.
मुंबईत रविवारी किमान तापमान २७ अंश सेल्सिअसपर्यंत किंचित कमी होण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर सोमवार आणि मंगळवारी तापमान पुन्हा २९ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. बुधवार ते शुक्रवारपर्यंत किमान तापमान २८-२९ अंश सेल्सियसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. सोमवार आणि मंगळवारी हलक्या पावसाच्या सरी अपेक्षित आहेत. या पावसाच्या सरी असूनही आठवडाभर दमट स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे
नैर्ऋत्य मोसमी वारे १० ते ११ जूनदरम्यान मुंबईत दाखल होतील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. अंदमान बेटांवर आधीच हजेरी लावणारा आणि ३१ मेपर्यंत केरळमध्ये दाखल होण्याच्या मार्गावर असलेला नैर्ऋत्य मोसमी पाऊस मुंबईत १० ते ११ जूनदरम्यान दाखल होण्याची शक्यता आहे, अशी माहिती भारतीय हवामान शास्त्र विभागाचे संचालक सुनील कांबळे यांनी दिली.
दरम्यान, मुंबईत उष्ण आणि दमट वातावरण असून तापमान ३५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. पुढील किमान दोन ते तीन दिवस आर्द्रतेचे प्रमाण कायम राहण्याची शक्यता आहे. मे महिन्याच्या अखेरीस मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात होईल, त्यामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडेल आणि मान्सूनच्या आगमनानंतर त्याचा जोर वाढेल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
शुक्रवारी मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह महाराष्ट्राच्या काही भागांत ४० ते ४४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट कायम राहण्याचा इशारा आयएमडीने दिला आहे.
संबंधित बातम्या