Mumbai Weather: गुलाबी थंडीने सुखावले मुंबईकर! तापमानात मोठी घट, ढगाळ वातावरण
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Weather: गुलाबी थंडीने सुखावले मुंबईकर! तापमानात मोठी घट, ढगाळ वातावरण

Mumbai Weather: गुलाबी थंडीने सुखावले मुंबईकर! तापमानात मोठी घट, ढगाळ वातावरण

Feb 12, 2024 12:32 PM IST

Mumbai Weather Forecast Today: राज्यात एकीकडे अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. तर मुंबईत मात्र, तापमानात घट झाली आहे. ही थंडी पुढील दोन दिवस कायम राहणार आहे.

Mumbai weather update
Mumbai weather update

Mumbai Weather update : राज्याच्या तापमानात मोठे बदल पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी पाऊस, काही ठिकाणी उन तर काही ठिकाणी थंडी नागरिक अनुभवत आहेत. राज्याची आर्थिक राजधानी मुंबईत मात्र, गेल्या काही दिवसापासूंन गुलाबी थंडी अनुभवायला मिळत आहे. पारा हा खाली घसरला असून पुढील काही दिवस तापमानात कमी राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. फेब्रुवारीच्या अखेरच्या आठवड्यापर्यंत मुंबईत थंडी कायम राहील अशी देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे.

CTA icon

तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

मुंबईच्या तापमानात पुन्हा एकदा घट झाली आहे. रविवारी उपनगरातील किमान तापमान हे १६.७ अंश डिग्री सेल्सियसपर्यंत घट झाली. तर काही ठिकाणी वातावरण ढगाळ होते. मुंबईत फेब्रुवारी महिन्याच्या अखेर पर्यंत रात्रीच्या वेळी गारवा राहणार आहे. गेल्या आठवड्यात मुंबईत दिवसाच्या आणि रात्रीच्या तापमानात वाढ झाली होती. सरासरी ३३ ते ३५ अंश डिग्री सेल्सियसपर्यंत दिवसा तपमानाची नोंद झाली होती.

मुंबईत पुढील दोन दिवस गुलाबी थंडी नागरिक अनुभवणार आहे. रविवारी रविवारी मुंबईचं किमान तापमान १६.७ डिग्री सेल्सियस होते. तर सोमवारी सकाळी देखील तापमानात १५ डिग्री पर्यंत होते. सध्या राज्यात उत्तरेकडून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या थंड वाऱ्याचा जोर वाढल्यामुळे मुंबईकर थंडीचा अनुभव घेत आहेत. दरम्यान, मुंबईत काही दिवस ढगाळ हवामान देखील राहणार आहे. तर मुंबईत पाऊस पडण्याची शक्यता नाही असा अंदाज देखील हवामान विभागाने वर्तवला आहे.

एकीकडे मुंबईकर गुलाबी थंडी अनुभवत आहेत. तर दुसरी कडे विदर्भात गारपीट आणि अवकाळी पावसामुळे शेती पिकाचे नुकसान झाले आहे. विदर्भातील नागपूर, भंडारा, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया आणि अमरावती जिल्ह्यात दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस होत आहे. यामुळे हरभरा, गहू, तूर, भाजीपाला आणि फळबागांचे नुकसान झाले आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर