मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Water Supply : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! बुधवारी 'या' भागात पाणीपुरवठा राहणार बंद! वाचा

Mumbai Water Supply : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! बुधवारी 'या' भागात पाणीपुरवठा राहणार बंद! वाचा

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jan 16, 2024 06:13 AM IST

Mumbai Water supply News : मुंबईतील ए, बी आणि ई परिसरात मुंबईतच्या तीन भागातील पाणी पुरवठा हा २४ तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या काळात पाणी जपून वापरण्याचे आवाहन मुंबई महानगर पालिकेने केले आहे.

Mumbai Water supply News
Mumbai Water supply News

Mumbai Water supply News : महानगरपालिकेच्या ई विभागातील पाणीपुरवठा व्यवस्थित करण्याकरिता नवानगर, डॉकयार्ड रोड येथे असलेली जुनी १२०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनी बंद करुन या ठिकाणी नवीन १२०० मि.मी. व्यासाची जलवाहिनी सुरु करण्यात येणार आहे. त्यासाठी भंडारवाडा जलाशयाला जाणाऱ्या जुन्या १२०० मि.मी. च्या जलवाहिनीवर जलद्वार बसविण्याचे काम उद्या बुधवारी हाटी घेतले जाणार असल्याने १७ जानेवारी सकाळी १० ते गुरुवारी १८ रोजी सकाळी १० वाजेपर्यंत असा २४ तासांसाठी पाणी पुरवठा बंद राजणार आहे. तर जे. जे. रुग्णालय परिसरात देखील कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याने नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन पालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत करण्यात आले आहे.

DGCA New SOP: विमान प्रवाशांसाठी मोठी बातमी.. उड्डाणाला विलंब झाल्यास एअरलाइन्स प्रवाशांना करणार Whatsapp मेसेज

ए विभाग-

नेव्हल डॉकयार्ड सप्लाय - सेंट जॉर्ज हॉस्पिटल, पी. डिमेलो रोड, रामगड झोपडपट्टी, आर. बी आय., नेव्हल डॉकयार्ड, शहीद भगतसिंग मार्ग, जी. पी. ओ. जंक्शनपासून रिगल सिनेमापर्यंत - (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ दुपारी १.३० ते सायंकाळी ४.१५ आणि रात्री ९.३० ते मध्यरात्री १.००) - दिनांक १८ जानेवारी २०२४ रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद.

ई विभाग–

नेसबीट झोन (१२०० मि.मी. आणि ८०० मि.मी.) - ना. म. जोशी मार्ग, मदनपुरा, कामाठीपुरा, एम. एस. अली मार्ग, एम. ए. मार्ग, आग्रीपाडा, टँक पाखाडी मार्ग, क्लेअर रोड, सोफिया जुबेर मार्ग, भायखळा (पश्चिम) (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ पहाटे ४.०० ते सकाळी ६.३०) - दिनांक १८ जानेवारी २०२४ रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद.

Makar Sankranti : मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर १२ लाख भाविकांनी केले प्रयागराज त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान; पाहा फोटो

म्हातारपाखाडी रोड झोन - म्हातारपाखाडी मार्ग, सेंट मेरी रोड, नेसबीट रोड, ताडवाडी रेल्वे कुंपण (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ सकाळी ६.३० ते सकाळी ८.१५) - दिनांक १८ जानेवारी २०२४ रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद.

डॉकयार्ड रोड झोन - बॅ. नाथ पै मार्ग, डिलिमा स्ट्रीट, गनपावडर रोड, कासार गल्ली, लोहारखाता, कॉपरस्मिथ मार्ग (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ दुपारी १२.२० ते दुपारी २.५०) - दिनांक १७ जानेवारी २०२४ रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद.

हातीबाग मार्ग - हातीबाग, शेठ मोतिशहा लेन, डि. एन. सिंघ मार्ग - (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ दुपारी ३.२० ते सायंकाळी ५.००) - दिनांक १७ जानेवारी २०२४ रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद.

जे. जे. रुग्णालय – (२४ तास पाणीपुरवठा) – कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.

मुंबई पोर्ट ट्रस्ट झोन - मुंबई पोर्ट ट्रस्ट, दारुखाना - (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ सायंकाळी ४.४५ ते सायंकाळी ५.५५) - दिनांक १७ जानेवारी २०२४ रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद.

रे रोड झोन - बॅ. नाथ पै मार्ग, मोदी कुंपण, ऍटलास मिल कुंपण, घोडपदेव छेद गल्ली क्रमांक १-३ (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ सायंकाळी ७.०० ते रात्री ८.१५) - दिनांक १७ जानेवारी २०२४ रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद.

माऊंट मार्ग - रामभाऊ भोगले मार्ग, फेर बंदर नाका, वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान, घोडपदेव नाका, म्हाडा संकुल, भायखळा (पूर्व), शेठ मोतिशहा लेन, टी. बी. कदम मार्ग, संत सावता मार्ग (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ सायंकाळी ७.१५ ते रात्री ९.००) - दिनांक १७ जानेवारी २०२४ रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद.

बी विभाग–

बाबूला टँक झोन - मोहम्मद अली मार्ग, इब्राहिम रहिमत्तुला मार्ग, इमामवाडा मार्ग, इब्राहिम मर्चंट मार्ग, युसूफ मेहेर अली मार्ग - (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ पहाटे ४.४० ते सकाळी ६.१०) – दिनांक १८ जानेवारी २०२४ रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद.

डोंगरी बी – झोन - नूरबाग, डोंगरी, रामचंद्र भट मार्ग, सॅम्युअल रस्ता, केशवजी नाईक मार्ग, नरसी नाथा रस्ता - (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ पहाटे ४.४० ते सकाळी ६.१०) - दिनांक १८ जानेवारी २०२४ रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद.

डोंगरी ‘ए’ झोन - उमरखाडी, वालपाखाडी, रामचंद्र भट मार्ग, समाताभाई नानजी मार्ग, शायदा मार्ग, नूरबाग आणि डॉ . महेश्वरी मार्ग - (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ रात्री ८.३० ते रात्री १०.००) - दिनांक १७ जानेवारी २०२४ रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद.

मुंबई पोर्ट ट्रस्ट झोन - सर्व मुंबई पोर्ट ट्रस्ट झोन, पी. डिमेलो मार्ग - (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ सायंकाळी ४.३० ते सायंकाळी ६.३० आणि रात्री ११.३० ते मध्यरात्री २.००) - दिनांक १७ जानेवारी २०२४ रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद.

मध्य रेल्वे – रेल्वे यार्ड (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ सायंकाळी ७.०० ते रात्री ८.००) - दिनांक १७ जानेवारी २०२४ रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद.

वाडी बंदर - पी. डिमेलो रोड, नंदलाल जैन मार्ग, लीलाधर शाह मार्ग, दानाबंदर, संत तुकाराम मार्ग - (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ सायंकाळी ४.२० ते सायंकाळी ५.३०) - दिनांक १७ जानेवारी २०२४ रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद.

वाडी बंदर - पी. डिमेलो मार्ग - (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ सायंकाळी ७.१५ ते रात्री ८.००) - दिनांक १७ जानेवारी २०२४ रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद.

आझाद मैदान बुस्टींग - (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ पहाटे ४.४० ते सकाळी ६.००) - दिनांक १७ जानेवारी २०२४ रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद.

संबंधित परिसरातील नागरिकांना विनंती करण्यात येते की, कृपया पाण्याचा पुरेसा साठा करुन ठेवावा, दिनांक १७ व १८ जानेवारी २०२४ रोजी पाणी जपून वापरावे आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेस सहकार्य करावे.

WhatsApp channel

विभाग