Mumbai Water supply : मोठा दिलासा! मुंबईतील गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी आणि विलेपार्ले भागांतील पाणीकपातीचा निर्णय रद्द
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Water supply : मोठा दिलासा! मुंबईतील गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी आणि विलेपार्ले भागांतील पाणीकपातीचा निर्णय रद्द

Mumbai Water supply : मोठा दिलासा! मुंबईतील गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी आणि विलेपार्ले भागांतील पाणीकपातीचा निर्णय रद्द

May 18, 2024 03:01 PM IST

Andheri Water Supply Updates: गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी आणि विलेपार्ले भागात पाणीकपात किंवा पुरवठ्यात व्यत्यय येणार नाही, असे बीएमसीने शुक्रवारी सांगितले.

मुंबई महानगरपालिकेने गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी आणि विलेपार्ले येथील पाणीकपातीचा निर्णय रद्द केला आहे.
मुंबई महानगरपालिकेने गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी आणि विलेपार्ले येथील पाणीकपातीचा निर्णय रद्द केला आहे.

Mumbai Water Cut News: जलवाहिनीची देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी येत्या २२ तारखेला मुंबईतील गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी आणि विलेपार्ले येथे १६ तासांसाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु, मुंबई महानगरपालिकेने तांत्रिक कारणास्तव पाणीकपातीचा हा निर्णय मागे घेतला. यामुळे नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.

अंधेरीच्या के पूर्व वॉर्डमध्ये दोन मुख्य जलवाहिन्या जोडण्यासाठी सावंत मार्ग आणि कार्डिनल ग्रेशियस मार्ग जंक्शन ते कार्डिनल ग्रेशियस मार्ग आणि सहार मार्ग जंक्शनपर्यंत हे काम केले जाणार होते. या कामादरम्यान जुनी खराब न झालेली १२०० मिमी व्यासाची जलवाहिनी काढली जाणार होती. या कामाला येत्या २२ मे रोजी सकाळी ०९.०० वाजता सुरुवात होणार असून २३ मे रोजी सकाळी १० वाजता समाप्त होणार होते. या कामाला १६ तास लागणे अपेक्षित होते. या कालावधीत गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी आणि विलेपार्ले येथील काही भागात पाणीपुरवठा किंवा पाणीकपातीची घोषणा केली होती. मात्र, तांत्रिक कारणास्तव काम रद्द करण्यात आले. यामुळे पाणीकपातीचा निर्णय रद्द करण्यात आला, असे बीएमसीने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

हे देखभालीचे काम पूर्ण झाल्यावर वेरावली जलाशय १,२ आणि ३ च्या पाणीपातळीत लक्षणीय सुधारणा होईल. अंधेरी पूर्व आणि अंधेरी पश्चिमसह जोगेश्वरी पूर्व आणि जोगेश्वरी पश्चिम आणि विलेपार्ले पूर्व आणि विलेपार्ले पश्चिम येथील पाणीपुरवठ्यात कायमस्वरूपी वाढ होईल, असे मुंबई महानगरपालिकेने आधीच स्पष्ट केले आहे.

सूर्य प्रादेशिक पाणीपुरवठा प्रकल्पाचा दुसरा टप्पा रखडला

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्पा रखडला. हे काम मे २०२४ पर्यंत पूर्ण होईल, असे अपेक्षित होते. आतापर्यंत दुसऱ्या टप्प्याचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. मात्र, काही कारणांमुळे या प्रकल्पाला विलंब झाला आहे. उर्वरित काम जूनअखेरीस पूर्ण होण्याची शक्यता आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मिरा-भाईंदर शहराला प्रतिदिन २१८ दशलक्ष लिटर पाणी पुरवठा होईल, असे एमएमआरडीएकडून सांगण्यात आले होते. यामुळे मुबलक पाण्यासाठी मिरा-भाईंदरकरांना आणखी काही महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे.

 

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर