Mumbai Water Cut: घाटकोपर, भांडुप आणि मुलुंडसह मुंबईच्या पूर्व उपनगरातील काही भागात २४ तास तात्पुरता पाणीपुरवठा खंडित करण्याची घोषणा बृहन्मुंबई महानगरपालिकेने २१ मे रोजी केली होती. २४ मे रोजी सकाळी ११.३० ते २५ मे रोजी सकाळी ११.३० वाजेपर्यंत पाणीकपात लागू राहणार आहे. मुलुंड गोरेगाव लिंक रोडवर (जीएमएलआर) सध्याची १२०० मिमी व्यासाची जलवाहिनी वळविण्याच्या कामामुळे शहरातील एन वॉर्ड, एस वॉर्ड आणि टी वॉर्डचा काही भाग बाधित होणार आहे.
मुलुंड (पश्चिम), टी वॉर्ड येथील फोर्टिस हॉस्पिटल ते उद्योग क्षेत्रापर्यंतचा हा भाग सध्या जीएमएलआर उड्डाणपुलाच्या पायाभरणीत अडथळा आणत असल्याने तो वळविण्याची गरज आहे. शटडाऊनच्या कालावधीसाठी पुरेसे पाणी साठवून ठेवावे आणि पाण्याचा सावधपणे वापर करावा, असा सल्लाही महापालिकेने नागरिकांना दिला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी पाणीपुरवठा सुरळीत झाल्यानंतर पुढील चार ते पाच दिवस पाणी उकळून प्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
विक्रोळी गाव (पूर्व), गोदरेज प्रॉपर्टीज, गोदरेज रुग्णालय. ( मध्यरात्रीनंतर ३.३० ते सकाळी ११.३०) – (२५ मे रोजी पाणीपुरवठा बंद राहील)
नाहूर (पूर्व), भांडुप (पूर्व), कांजूर (पूर्व) चा संपूर्ण परिसर, टागोर नगर संपूर्ण परिसर, कन्नमवार नगर विक्रोळी (पूर्व) येथील इमारत क्रमांक १ ते ३२ व २०३ ते २१७ (मध्यरात्रीनंतर ३.३० ते सकाळी ११.३० ते २५ मे रोजी पाणीपुरवठा बंद राहील) मुलुंड-गोरेगाव जोडरस्ता लगतचा परिसर (ऐशफोर्ड टॉवर, रुणवाल टॉवर, फोर्टिस रुग्णालय ते सोनापूर वाहतूक दिव्यापर्यंतचा परिसर), सीएट टायर मार्ग लगतचा परिसर (सुभाषनगर, एम. एम. आर. डी. वसाहत), गाव रोड, दत्त मंदीर मार्ग, अंजना इस्टेट, शास्त्री नगर, उषा नगर, लाल बहादूर शास्त्री मार्ग लगतचा परिसर (भांडुप पश्चिम), सोनापूर, गावदेवी मार्ग, जंगल मंगल मार्ग, लेक मार्ग, द्राक्ष बाग, काजू टेकडी, जनता मार्केट, टँक रोड परिसर, महाराष्ट्र नगर, कोकण नगर, सह्याद्री नगर, क्वारी मार्ग व प्रतापनगर मार्ग लगतचा परिसर.
मुलुंड-गोरेगाव जोडरस्ता लगतचा परिसर (मुलुंड पश्चिम), लाल बहादूर शास्त्री मार्ग लगतचा परिसर (मुलुंड पश्चिम), जे. एन. मार्ग, देवीदयाल मार्ग, क्षेपणभूमी मार्ग (डम्पिंग रोड), डॉ. आर. पी. मार्ग, पी. के. मार्ग, झवेर मार्ग, एम. जी. मार्ग, एन. एस. मार्ग, एस. एन. मार्ग, आर. एच. बी. मार्ग, वालजी लाढा मार्ग, व्ही. पी. मार्ग, मदन मोहन मालविय मार्ग, एसीसी मार्ग, बी. आर. मार्ग, गोशाळा मार्ग, एस. एल. मार्ग, नाहुर गाव ( २४ तास पाणीपुरवठा बंद)
संबंधित बातम्या