Water Cut in Mumbai : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा; पाईपलाईन दुरुस्तीसाठी आज 'या' भागात पाणी बंद!-mumbai water cut today in some area of city due to maintenance work ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Water Cut in Mumbai : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा; पाईपलाईन दुरुस्तीसाठी आज 'या' भागात पाणी बंद!

Water Cut in Mumbai : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा; पाईपलाईन दुरुस्तीसाठी आज 'या' भागात पाणी बंद!

Aug 24, 2024 07:05 AM IST

Water Cut in Mumbai : मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी आहे. आज काही भागतील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन केलं आहे.

मुंबईकरांनो पाणी जपून वापरा; पाईपलाईन दुरुस्तीसाठी आज 'या' भागात आज पाणी बंद!
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा; पाईपलाईन दुरुस्तीसाठी आज 'या' भागात आज पाणी बंद! (HT)

Water Cut in Mumbai : पवई येथील आरे वसाहतीजवळ गौतम नगर येथे जलवाहिनी फुटल्याने मोठ्या प्रमाणात पानी वाया गेले आहे. या पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. ही पाइपलाइन फुटल्याने एच पूर्व, के पूर्व, जी उत्तर आणि एस विभागातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. त्यामुळे मुंबईतील काही भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे, यामुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहन मुंबईमहानगर पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने केले आहे.

मुंबईतील पवई येथील आरे वसाहतीजवळच्‍या गौतम नगर परिसरात पाइप लाइन फुटईली. ही पाईपलाईल १८०० मिलीमीटर व्यासाच्‍या तानसा (पश्चिम) मुख्य जलवाहिनीवर असून शुक्रवारी दुपारी १ च्‍या सुमारास ती फुटल्याने या पाईपलाइन मधून पाण्याची मोठी गळती होऊ लागली. या पाईपलाईनच्या दुसरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. सहायक अभियंता नगर बाह्य (प्रमुख जलवाहिन्‍या) विभागाचे अधिकारी, कर्मचारी, कामगारांनी पाईपलाईन बंद करून ही गळती तात्पुरत्या स्वरूपात थांबवली. सध्या दुरुस्तीचे काम सुरू असून यामुळे आज एच पूर्व, के पूर्व, जी उत्तर आणि एस विभागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

या भागातील पाणी पुरवठा रहाणार बंद

के पूर्व विभाग

गोविंदवाडी, प्रकाशवाडी, मालपा डोंगरी 1/2, हनुमान नगर, मोटा नगर, शिवाजी नगर, शहीद भगतसिंग वसाहत , मुकुंद रुग्णालय, इंदिरा नगर, मापकंद नगर, टाकपाडा, टेक्निकल परिसर, विमानतळ मार्ग, चिमटपाडा, सानबाग, मरोळ, एम. आय. डी. सी. परिसर, रामकृष्ण मंदीर मार्ग, जे. बी. नगर, बागरखा मार्ग, कांती नगर (पाणीपुरवठा बंद राहील)

सहार रोड, कबीर नगर, बामणवाडा, पारशीपाडा, विमानतळ वसाहत, तरुण भारत वसाहत, इस्लामपुरा, दौलतवाडी, पी. एन. टी. वसाहत (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ दुपारी २ ते सायंकाळी ३.३० पाणीपुरवठा बंद राहणार आहे. मिलिटरी मार्ग, विजय नगर, मरोळ-मरोशी मार्ग (पाणीपुरवठा बंद राहील)

मुलगाव डोंगरी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एम. आय. डी. सी.) मार्ग क्रमांक १ ते २३ , ट्रान्स अपार्टमेंट, कोंडिविटा, उपाध्याय नगर, ठाकूर चाळ, साळवे नगर, वाणी नगर, दुर्गापाडा, मामा गॅरेज ओम नगर, कांती नगर, राजस्थान गृहनिर्माण संस्था, साईनगर, सहार गांव, सुतार पाखाडी, कार्गो संकुल

एच पूर्व विभाग

वांद्रे रेल्वे टर्मिनस परिसर, बेहरामपाडा

जी उत्तर विभाग

धारावी (पाणीपुरवठा बंद राहील)

एस विभाग

गौतम नगर, जयभीम नगर, फिल्टरपाडा, बेस्ट सर्कल, गावदेवी, इस्लामिया चाळ, पठाणवाडी, महात्मा फुले नगर कैलास नगर, पासपोली गाव, निटी परिसर, अमृत हॉटेल लगतचा परिसर (पाणीपुरवठा कमी दाबाने राहील)

विभाग