Mumbai Water Cut news : मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी आहे. पश्चिम उपनगरातील काही भागात दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. २७ व २८ मे रोजी पी उत्तर, आर दक्षिण आणि आर मध्य विभागातील काही भागात पाणी पुरवठा होणार असल्याने नागरिकांनी पाणी जपून वपरण्याचे आवाहन पालिकेच्या अधिकाऱ्यांनी केले आहे. येथील जीर्ण झालेल्या जलवाहिनी बदलण्याचे काम पालिकेने हाती घेतले आहे. त्यामुळे दोन दिवस हा पाणी पुरवठा बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे एक दिवस पाणी पुरेल असा साठा करून ठेवावा असे आवाहन करण्यात आले आहे.
पालिकेने दिलेल्या माहितीनुसार मालाड पश्चिम भागातील पाणी पुरवठ्यात कायमस्वरूपी सुधारणा करण्याच्या हेतूने पी उत्तर विभागातील मार्वे मार्गावरील ९०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी ही बदलण्यात येणार आहे. ही जलवाहिनी जीर्ण झाली असून वारंवार फुटत असल्याने हे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे सोमवारी (दि २७) रात्री १० पासून तर मंगळवारी २८ मे रोजी रात्री १० पर्यंत येथील जलवाहिनी बदलन्याचे काम हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे सोमवारी आणि मंगळवारी पी उत्तर, आर दक्षिण व आर मध्य या भागात पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. दोन दिवस पाणी नअसल्याने नागरिकांनी एक दिवस पाणी पुरेल असा साठा करून ठेवावा लागणार आहे.
जलवाहिनी बदलण्याच्या काम हे मार्वे मार्गावरील शिंदे गॅरेज ते ब्ल्यू हेवेन हॉटेल येथे केली जाणार आहे. या सोबतच मार्वे मार्ग, मालाड पश्चिम, पी उत्तर विभागापर्यंत मार्वे रस्त्यालगत असलेली जलवाहिनी देखील बदलण्यात येणार आहे. या ठिकाणी ९०० मि.मी. बाय ९०० मि.मी. व्यासाची जलवाहिनी जोडणी व जुनी ९०० मि.मी. जलवाहिनी काढून नवी जलवाहिनी ही लावली जाणार आहे. या कामतानंतर भूमिगत गळतीचे प्रमाण कमी होऊन जलवाहिनीतील पाण्याचा दाब वाढण्यास मदत होणार आहे.
पी उत्तर विभाग – अंबोजवाडी (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ रात्री ११.३० ते मध्यरात्रीनंतर १२.३५) २७ मे २०२४ रोजी पाणीपुरवठा बंद राहील.
पी उत्तर- आजमी नगर (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ रात्री १२.०० ते मध्यरात्रीनंतर १.३०) – २८ मे २०२४ रोजी पाणीपुरवठा बंद राहील.
पी उत्तर विभाग- जनकल्याण नगर (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ रात्री १.३० ते मध्यरात्रीनंतर ३.००) – २८ मे २०२४ रोजी पाणीपुरवठा बंद राहील.
पी उत्तर विभाग- मालवणी (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ सकाळी ०८.०० ते सकाळी ११.५०) – २८ मे २०२४ रोजी पाणीपुरवठा बंद राहील.
पी उत्तर विभाग- अली तलाव मार्ग, गावदेवी मार्ग, इनासवाडी, खारोडी, राठोडी गाव, मालवणी गाव, खारोडी गाव, मनोरी, पटेलवाडी, शंकरवाडी, मार्वे गाव, मढ क्षेत्र, मनोरी गाव (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ दुपारी ४.२० ते रात्री १०.०० ) – २८ मे २०२४ रोजी पाणीपुरवठा बंद राहील.\
आर दक्षिण विभाग- छत्रपती शिवाजी महाराज संकूल, न्यू म्हाडा ले आऊट (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ मध्यरात्रीनंतर ०१.३० ते मध्यरात्रीनंतर ३.००) – २८ मे २०२४ रोजी पाणीपुरवठा बंद राहील.
आर मध्य विभाग- गोराई गाव, बोरिवली (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ सायंकाळी ०५.३० ते सायंकाळी ०७.३०) – २८ मे २०२४ रोजी पाणीपुरवठा बंद राहील.