Mumbai Rain Water Cut News : मुंबईत सोमवारी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे मुंबईच्या पाणी पुरवथ्यावर देखील मोठा परिणाम झाला आहे. वादळामुळे पवईतील विद्युत उपकेंद्रात बिघाड झाला आहे. पावसामुळे येथील २२ केव्ही विद्युत उपकेंद्राचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे कुर्ला येथील दक्षिण वाहिनीतून मुंबईला होणारा पाणीपुरवठा हा बंद कऱण्यात आला आहे. या केंद्रातील दुरुस्तीचे कामे पूर्ण होईपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहन महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने केले आहे.
सोमवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे मुंबईकरांची चांगलीच धांदल उडाली. घाटकोपर येथे होर्डिंग कोसळल्याने १४ जणांचा मृत्यू झाला आहे. या पावसामुळे मुंबईच्या लोकल सेवेवर देखील परिणाम झाला होता. या सोबतच मुंबईचा पाणी पुरवठा देखील विस्कळीत झाला आहे. वाऱ्यामुळे आणि पावसामुळे सोमवारी संध्याकाळी पवई येथील २२ केव्ही विद्युत उपकेंद्राचे मोठे नुकसान झाले. पवई उदंचन केंद्राला होणारा विद्युत पुरवठा यामुळे बंद झाला आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या एल व एस विभागात आज पाणी पुरवठा होणार नाही असे पालिकेने सांगितले आहे. सध्या विद्युत उपकेंद्राची दुरूस्ती व पवई उदंचन केंद्रातील विद्युत पुरवठा सुरळी करण्यासाठी युद्धपतिळीवर प्रयत्न सुरू आहेत. हा बिघाड दुरुस्त झाल्यावर येथील दोन्ही विभागात पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे. त्यामुळे हा बिघाड दुरुस्त होई पर्यंत नागरिकांनी पाणी जपून व काटकसरीने वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबईत झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे पवई विद्युत उपकेंद्रातील अनेक उपकरणे खराब झाली आहेत. तर काही ठिकाणच्या वीजवाहिन्या देखील तुटल्या आहेत. या मुळे एस विभागातील मोरारजी नगर, लोकविहार सोसायटी, रेनेसेन्स हॉटेल, जय भीम नगर, पासपोली गावठाण परिसरात पाणीपुरवठा होणार नाही. महात्मा फुले नगरच्या भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
वाडिया इस्टेट, एम. एन रोड बैल बाजार, संदेश नगर, क्रांती नगर, एल.बी.एस.कमानी, एल विभागात काजूपाडा, गणेश मैदान, इंदिरानगर, संगम सोसायटी, शास्त्रीनगर, गॅस कंपाउंड, चित्रसेन गाव, मसरानी लेन, गाजी दर्गा रोड, ए. एच. वाडिया मार्ग, ब्राह्मण वाडी, पटेल वाडी, एस जी बर्वे मार्ग, बुद्ध कॉलनी, न्यू मिल रोड मार्ग विनोबा भावे मार्ग, नावपडा, प्रमियर रसिडेन्स, कल्पना टॉकीज, किस्मत नगर, गफुर खान इस्टेट, संभाजी चौक, न्यू मिल रोड, रामदास चौक, ईगलवाडी, आण्णासागर मार्ग, सुंदरबाग, शिव टेकडी संजय नगर, कपाडिया नगर, रूपा नगर, न्यू मिल रोड, ताकिया वॉर्ड, मॅच फॅक्टरी लेन, शिवाजी कुटीर लेन, टॅक्सीमन कॉलनी, इंदिरा नगर, महाराष्ट्र काटा, एल. बी. एस रोड, चाफे गल्ली, चूनाभट्टी, सेवक नगर, विजय नगर आणि जरी मरी माता मंदिर परिसरात पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
महानगरपालिका प्रशासनाने दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. हे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. हा बिघाड दुरुस्त झाल्यावर पवई उच्च स्तरीय जलाशय क्रंमांक कप्पा क्रमांक २ वरून पाणीपुरवठा सुरळीत होईल.
संबंधित बातम्या