Viral Video: माहीम स्थानकाजवळील रेल्वे ट्रॅकवर जेवण बनवतानाचा व्हिडिओ व्हायरल!
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Viral Video: माहीम स्थानकाजवळील रेल्वे ट्रॅकवर जेवण बनवतानाचा व्हिडिओ व्हायरल!

Viral Video: माहीम स्थानकाजवळील रेल्वे ट्रॅकवर जेवण बनवतानाचा व्हिडिओ व्हायरल!

Feb 04, 2024 10:53 PM IST

Mahim Railway Station Viral Video: माहीम स्थानकाजवळील रेल्वे ट्रॅकचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

Viral Video
Viral Video

Mumbai Local Viral Video: माहीम स्थानकाजवळील एक अनपेक्षित प्रकार उघडकीस आला आहे, जिथे काही लोक चक्क रेल्वे ट्रॅकवर राहत असल्याचे दिसत आहे. एका ट्विटर वापरकर्त्याने रेल्वे प्रशासन, मुबंई पोलिसांना टॅग करत एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत काही लोक चक्क रेल्वे ट्रॅकवर जेवण बनवताना आणि कपडे वाळवताना दिसत आहेत. या व्हिडिओने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये काही लोक रेल्वे ट्रॅकवर जेवण बनवत आहेत. तसेच लहान मुले इकडे तिकडे धावताना दिसत आहेत. तर, काही लोक चक्क रेल्वे ट्रॅकवर झोपल्याचे दिसत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर रेल्वे प्रोटेक्शन फोर्सने त्वरीत घटनास्थळ गाठून परिसर साफ केला. काही लोक ट्रॅकवर त्यांचे कपडे वाळवताना दिसले, ज्यामुळे ते लोक रेल्वे ट्र्रॅकवरच राहत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.

Viral Video: पोलिसांच्या कारमधील पेट्रोल संपलं, कैद्यांनी ५०० मीटरपर्यंत ढकलली गाडी, पाहा व्हिडिओ

रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या रेल्वे ट्रॅकचा वापर रात्रीच्या वेळी गाड्यांना साइडिंगसाठी केला जातो. झोपडपट्टीतील रहिवासी अधूनमधून या ट्रॅकवर जातात आणि बेघर भिकारी कपडे वाळवण्यासारख्या विविध कामांसाठी ही जागा वापरतात. परिस्थिती हाताळण्यासाठी आणि रेल्वे परिसराची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आता नियमित गस्त आयोजित केली जात आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर