मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai : मुंबईत मन विचलित करणारे दृष्य, रेल्वे रुळावर जेवण बनवतानाचा, मुली अभ्यास करतानाचा Viral Video

Mumbai : मुंबईत मन विचलित करणारे दृष्य, रेल्वे रुळावर जेवण बनवतानाचा, मुली अभ्यास करतानाचा Viral Video

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 27, 2024 05:00 PM IST

Mumbai Viral Video : सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत असून त्यामध्ये काही मुली रुळावर बसून पुस्तक वाचताना दिसत आहेत. तसेच काही महिला रुळावरच बसून जेवण बनवताना दिसत आहेत

Mumbai Viral Video
Mumbai Viral Video

मुंबईची लाइफलाइन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनचे रुळावर काही लोकांनी आपला संसार वसवला आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत असून त्यामध्ये काही मुली रुळावर बसून पुस्तक वाचताना दिसत आहेत. तसेच काही महिला रुळावरच बसून जेवण बनवताना दिसत आहेत आणि काही लोक दोन्ही रुळांच्या मध्ये झोपल्याचे दिसत आहेत. हा व्हिडिओ समोर येताच रेल्वे प्रशासन खडबडून जागे झाले आहे. मध्य रेल्वेच्या व्यवस्थापकांनी यावर प्रतिक्रिया देताना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

रेल्वे रुळावर अशा पद्धतीने जेवण बनवणे व झोपणे धोकादायक आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओचा आता तपास केला जात आहे.

हा व्हिडिओ एक्सवर मुंबई मॅटर्स नावाच्या ट्विट रहँडलवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ मुंबईतील माहिम जंक्शन रेल्वे स्टेशनवरील असल्याचे सांगितले जात आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. त्याचबरोबर हे दृष्य पाहून काही जणांनी चिंता व्यक्त करत याबाबत तक्रार व्यक्त केली आहे.

हा व्हिडिओ २४ जानेवारी रोजी एक्सवर शेअरकरण्यात आला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुंबई सेंट्रलच्या डीआरएमने यावर लक्ष दिले असून पश्चिम रेल्वेअधिकाऱ्यांना परिस्थितीची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. रेल्वे सुरक्षादल (आरपीएफ)ला कारवाईचे आदेश दिले आहेत. आरपीएफने एक्सच्या माध्यमातून उत्तर दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की,  रुळावरून लोकांना हटवण्यात आले आहे.

WhatsApp channel