Mumbai University job Vacancy : मुंबई विद्यापीठात मेगा भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. एकूण १५२ जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी ७ ऑगस्ट पर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबई विद्यापीठात १५२ जागांवर ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यात विद्याशाखांचे डीन या पदासाठी ४ जागा, प्राध्यापक पदासाठी २१ जागा, सहयोगी प्राध्यापक/ उप ग्रंथपाल या पदासाठी ५४ जागा तर, सहयोगी प्राध्यापक / सहयोगी ग्रंथपाल या पदासाठी ७३ जागा आहेत. इच्छुकांनी ऑनलाइन अर्ज सादर करून ते मुंबई विद्यापीठ, खोली क्रमांक 25, फोर्ट, मुंबई-400032 या पत्त्यावर पाठवायचे आहेत.
अर्ज करणारे उमेदवार हे पद क्र.१ - १) संबंधित विषयात पीएचडीत ५५ टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी, पुस्तके आणि संशोधन/पॉलिसी पेपर म्हणून कीमान १० प्रकाशने केली असावी. शिवाय १५ वर्षे कामाचा अनुभव अशी अट ठेवण्यात आली आहे.
तर पद क्र.२ - १ ) संबंधित विषयात पीएचडी, पुस्तके आणि संशोधन/ पॉलिसी पेपर म्हणून १० प्रकाशने, १० वर्षे अनुभव असावा अशी अट आहे.
पद क्र.३ संबंधित विषयात पीएचडी ५५ टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी, पुस्तक, ७ पेपर प्रकाशन व ८ वर्षे अनुभव या सोबतच नेट, सेट किंवा ग्रंथालय विज्ञान/ माहिती विज्ञान/ दस्तऐवजीकरण विज्ञान पदव्युत्तर पदवी आणि ८ वर्षे अनुभव असावा.
पद क्र.4 साठी ५५ टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी व नेट सेट किंवा ग्रंथालय विज्ञान/माहिती विज्ञान/दस्तऐवजीकरण विज्ञान पदव्युत्तर पदवी असणे गरजेचे आहे.
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय कमाल ५६ वर्षे. असावे अशी अट आहे. तर नोकरीचे ठिकाण मुंबई आहे.
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकडून ५०० तर मागासवर्गीय कॅटेगरीतील उमेदवारांकडून २५० रूपये शुल्क आकारले जाणार आहे.
या भरती प्रक्रियेबाबत मुंबई विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाइट https://mu.ac.in/ वर विस्तृत माहिती देण्यात आली आहे. तर अर्जदार https://muappointment.mu.ac.in/ या लिंकवर जाऊन अर्ज करू शकतात.
या भरतीची अधिकृत जाहिरात https://drive.google.com/file/d/1JM3P8Q9jeFZEVVPn6FuPFzne7FDoohKn/view?usp=sharing या संकेत स्थळावर देण्यात आली आहे.
विभागीय डीन पदासाठी १,४४,२०० रुपये प्रति महिना तर प्राध्यापक पदासाठी १,४४,२०० रुपये प्रति महिना. तर असोसिएट प्रोफेसर/डेप्युटी लायब्ररीयन पदासाठी १,३१,४०० रुपये प्रति महिना पगार दिला जाणार आहे. तर सहाय्यक प्राध्यापक / सहाय्यक ग्रंथपाल पदासाठी ५७७०० रुपये प्रति महिना पगार दिला जाणार आहे.
ही निवड प्रक्रिया मुलाखतीच्या आधारे पार पडणार आहे. भरलेल्या अर्जाचे तीन संच वर दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहेत. तर ऑनलाइन पद्धतीने सबमिट केलेले अर्ज आणि कागदपत्रांसह तीन संचातील प्रिंटआउटच्या प्रती आलेल्यांचाच विद्यापीठाकडून विचार केला जाणार आहे. उमेदवारांनी अर्जाच्या सर्व संचासह त्यांचा बायोडेटा सबमिट करणे आवश्यक आहे.
संबंधित बातम्या