Mumbai University Exam Postpone: मुंबई, उपनगरे आणि ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि सोय लक्षात घेता, मुंबई विद्यापीठातील आज मंगळवारी (९ जुलै) सकाळी आणि दुपारच्या दोन्ही सत्रातील सर्व परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. या परीक्षांच्या नवीन तारखा लवकरच जाहीर केल्या जातील, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक पूजा रौदळे यांनी सांगितले.
मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून मुळसधार पाऊस सुएरू आहे. तर पुढील काही दिवस मुंबईला अतिवृष्टी होण्याच्या इशारा देण्यात आला आहे. या पावसामुळे मुंबईसह राज्याच्या विविध जिल्ह्यांमधील जनजीवन विस्कळीत असून अनेक ठिकाणी पुरस्थिती निर्माण झाली आहे. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी मुंबई महानगरपालिकेच्यावतीने मुंबईतील दोन्ही सत्रातील शाळांना व कॉलेजला सुट्टी जाहीर केली आहे. तर पावसामुळे वाहतुकीचा देखील बोजवारा उडल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये या साठी आज होणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या नियोजित परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आलेत.
सोमवारी दिवसभर मुंबईत पावसाचा जोर कायम होता. तर मंगळवारी देखील मुंबईत जोरदार पावसाची शक्यता आहे. येत्या काही तासांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असल्याने मुंबई, ठाणे, कोकण, पुणे, सातारा, रायगड जिल्ह्यातील १ ली ते १२ वीच्या सर्व माध्यमांच्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठाच्या सीडीओई म्हणजेच आयडॉलच्या ११ ते २ या वेळेत परीक्षा होणार होत्या. मात्र, मुंबईला पावसाचा अलर्ट देण्यात आल्याने या परीक्षा देखील रद्द करण्यात आल्या आहेत. रद्द करण्यात आलेल्या परीक्षा १३ जुलै रोजी ११ ते २ या वेळेत नियोनीत परीक्षा केंद्रावर होणार आहे.
मुंबईत आज जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवला आहे. पावसामुळे अनेक भगत पाणी साचण्याची शक्यता आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून घरीच थांबण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
संबंधित बातम्या