मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai University exam : मुंबई विद्यापीठाच्या २२ जानेवारी होणाऱ्या १४ परीक्षा पुढे ढकलल्या; 'ही' आहे नवी तारीख

Mumbai University exam : मुंबई विद्यापीठाच्या २२ जानेवारी होणाऱ्या १४ परीक्षा पुढे ढकलल्या; 'ही' आहे नवी तारीख

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jan 21, 2024 10:15 AM IST

Mumbai University Exam postponed : अयोध्या येथील राम मंदिर सोहळ्यासाठी राज्य सरकारने २२ जानेवारी रोजी शासकीय सुट्टी जाहीर केल्याने मुंबई विद्यापीठाच्या १४ परीक्षा या रद्द करण्यात आल्या आहेत.

Mumbai university
Mumbai university

Mumbai University Exam postponed : अवघा देश २२ तारखेला राम मंदिर प्रतिष्ठापणा सोहळा साजरा करणार आहे. या साठी केंद्राने अर्ध्या दिवसाची तर महाराष्ट्र शासनाने पूर्ण दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. यामुळे आधी पुणे विद्यापीठाच्या २२ तारखेला होणाऱ्या परीक्षा या पुढे ढकलण्यात आल्या होत्या. तर आता मुंबई विद्यापीठाने देखील त्यांच्या १४ परीक्षा या पुढे ढकलल्या आहेत. या परीक्षा आता २२ ऐवजी ३१ जानेवारी रोजी घेतल्या जाणार आहेत.

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरात महापूजेला सुरुवात, राजाधिराजांच्या रूपाने आज प्रभू श्री रामाचा होणार मंदिरात प्रवेश

राज्य सरकारणेने अयोध्येतील श्री रामाच्या मूर्ती प्रतिष्ठापणा सोहळ्यासाठी एक दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. २२ तारखेला मुंबई विद्यापीठाच्या तब्बल १४ परीक्षा नियोजित होत्या. मात्र, आता या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून या आता २२ ऐवजी ३१ तारखेला घेतल्या जाणार आहेत. या बाबतचा निर्णय परीक्षा व मूल्यमापन मंडळाने घेतला असून तसे परिपत्रकही जारी करण्यात आले आहे.

लिंगबदल शस्त्रक्रिया करून पुरुष झालेला बीडमधील 'तो' पोलीस शिपाई झाला बाबा; पत्नीने दिला मुलाला जन्म

मुंबई विद्यापीठाच्या सकाळच्या सत्रातील बी.कॉम. सत्र ५ , एम.ए. पब्लिक पॉलिसी सत्र ३, एम.ए. राज्यशास्त्र सत्र १, एम.एस्सी. रिसर्च सत्र १ या चार होणार होत्या. तर दुपारच्या सत्रात बी.एम.एस. – एम.बी.ए. (५ वर्षीय एकत्रित अभ्यासक्रम) सत्र १, तृतीय वर्ष बी.ए. सत्र ५, प्रथम वर्ष एल.एल.बी. – जन. एल.एल.बी. (३ वर्षीय अभ्यासक्रम ) सत्र १, प्रथम वर्ष एल.एल.बी. – बीएलएस (५ वर्षीय अभ्यासक्रम) सत्र १, एल.एल.बी. (३ वर्षीय अभ्यासक्रम, ७५ : २५) सत्र १, बी.ए. एल.एल.बी. (५ वर्षीय एकत्रित अभ्यासक्रम, ७५ : २५) सत्र १, प्रथम वर्ष एल.एल.बी. – जन. एल.एल.बी. (३ वर्षीय अभ्यासक्रम, ६० : ४०) सत्र १, प्रथम वर्ष एल.एल.बी. – बीएलएस (५ वर्षीय अभ्यासक्रम, ६० : ४०) सत्र १, एम.एस.डब्ल्यू. सत्र ३, एम.एस्सी. रिसर्च सत्र ३ या १० परीक्षा होणार होत्या. या सर्व १४ परीक्षा आता नव्या वेळेनुसार बुधवारी (दि ३१) घेतल्या जाणार आहेत.

मुंबई विद्यापीठाची दूर व मुक्त अध्ययन संस्था म्हणजेच ‘आयडॉल’च्या तीन परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आल्या आहेत. प्रथम वर्ष बी.ए. सत्र १ आणि प्रथम वर्ष बी.कॉम. सत्र १ ची परीक्षा ही पुढील महिन्यात ६ फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार आहेत. तर एम.एम.एस सत्र २ ची परीक्षा ही गु १ फेब्रुवारीला घेतली जाणार आहे.

WhatsApp channel