मुंबई विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी ३ वर्ष आणि ४ वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशपूर्व ऑनलाइन नोंदणीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. नोंदणी प्रक्रिया शनिवार, २५ मे रोजी सायंकाळी ५ वाजता सुरू होईल. या पदवी अभ्यासक्रमांसाठी अस्वायत्त महाविद्यालयांमध्ये मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरणाची (एनईपी) प्रथमच अंमलबजावणी होत आहे.
शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी मुंबई विद्यापीठात बॅचलर ऑफ आर्ट्स (बीए), बॅचलर ऑफ सायन्स (B.Sc), बॅचलर ऑफ कॉमर्स (B.Com) आणि इतर अनेक अभ्यासक्रमांसह विविध प्रकारचे पदवी अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या (एआयसीटीई) अंतर्गत आलेल्या बीएमएस, बीबीए, बीसीए सारख्या अभ्यासक्रमांचे प्रवेश यंदा प्रथमच सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) सेलद्वारे पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर घेण्यात येणार आहेत. प्रवेश प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी सर्व संलग्नित व स्वायत्त महाविद्यालयांनी जाहीर केलेल्या वेळापत्रकाचे पालन करावे, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालिका पूजा रौंदळे यांनी केले.
अर्ज विक्री (संबंधित महाविद्यालयांकडून ऑनलाइन/ऑफलाइन) : २५ मे ते १० जून २०२४ पर्यंत दुपारी १.०० वाजेपर्यंत.
प्रवेशपूर्व ऑनलाइन नोंदणी: २५ मे ते १० जून.
ऑनलाइन प्रवेश अर्ज सादर करणे: २५ मे ते १० जून २०२४ पर्यंत दुपारी १.०० वाजेपर्यंत, प्रवेशपूर्व नोंदणी आवश्यक)
पहिली गुणवत्ता यादी: १३ जून २०२४ (सायंकाळी ५:००)
ऑनलाइन कागदपत्र पडताळणी व शुल्क भरणा : १४ जून ते २० जून २०२४ (दुपारी ३.०० वाजेपर्यंत)
दुसरी गुणवत्ता यादी: २१ जून २०२४ (सायंकाळी ५:०० वाजता)
ऑनलाइन कागदपत्र पडताळणी व शुल्क भरणा: २२ जून ते २७ जून २०२४ (दुपारी ३ वाजेपर्यंत)
तिसरी गुणवत्ता यादी: २८ जून (सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत)
ऑनलाइन कागदपत्र पडताळणी व शुल्क भरणा: २९ जून ते ३ जुलै २०२४ (दुपारी ३.०० वाजेपर्यंत)
वर्ग/ओरिएंटेशन सुरू होणे: ४ जुलै २०२४.
संबंधित बातम्या