Mumbai Metro Line 3: बहचर्चित आणि बहुप्रतिक्षित 'मेट्रो -३ अॅक्वा लाइन'वरील पहिली मेट्रो आज ११ वाजता धावणार आहे. ही मार्गिका आजपासून नागरिकांच्या सेवेसाठी खुली करण्यात आली आहे. या मार्गावरील पहिली मेट्रो ही आरे जेव्हीएलआर व बीकेसी या दोन्ही स्थानकांमधून निघणार आहे. या मार्गीकेमुळे दक्षिण मुंबईतील नागरिकांना फायदा होणार आहे.
मुंबईकरांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी भुयारी मेट्रो तयार करण्यात आली आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसीएल) मेट्रो कनेक्ट ३ ही मार्गिका आज पासून सुरू केली आहे. नागरिकांना या मार्गीकेची माहिती देण्यासाठी अॅप देखील तयार करण्यात आले आहे. या अॅपच्या माध्यमातून प्रवाशांना आरे ते बीकेसी दरम्यानच्या सर्व स्थानकांची व येथील सर्व सुविधांची माहिती दिली जाणार आहे. हे अॅप इंग्रजी, मराठी आणि हिंदी भाषेत आहे.
मेट्रोतर्फे तयार करण्यात आलेल्या या अॅपमध्ये जवळच्या मेट्रो स्थानकांची माहिती देण्यात आली आहे. तसेच यात तिकीट दर किती, गाड्यांचे वेळापत्रक याची देखील माहिती देण्यात आली आहे. प्रवाशांच्या तक्रारीसाठी देखील यात सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच त्या सोडवण्याची व्यवस्था देखील यात आहे. मेट्रो स्थानकावर उतरल्यानंतर इच्छित स्थळी जाण्यासाठी बस, टॅक्सी, रिक्षाचा पर्याय देखील यात आहे. या मार्गीकेवर असलेल्या स्थानकावर ‘एमएमआरसीएल’ने क्यूआर कोड स्कॅनिंग असून या द्वारे प्रवाशांना ऑनलाइन आणि ऑफ लाइन तिकिट देखील काढता येणार आहे.
या संपूर्ण मार्गिकेवरील जोगेश्वरी-विक्रोळी हे स्थानक जमिनीवर आहे. तर इतर सर्व स्थानके हे भूमिगत आहेत. जोगेश्वरी उपनगरीय रेल्वे स्थानकापासून मात्र १० मिनिटे अंतरावर आहे.
मेट्रो लाईन-३ मध्ये १२.६९ किमी अंतरात एकूण १० मेट्रो स्थानक आहेत. संपूर्ण मेट्रो-३ कॉरिडॉर सुमारे ३३ किमी लांबीचा आहे. मेट्रो लाइन- ३ मुळे बीकेसी, प्रभादेवी, दादर, वरळी, महालक्ष्मी, मुंबई सेंट्रल, मरीन लाइन्स, चर्चगेट, नरिमन पॉईंट, कफ परेड आणि मुंबई विमानतळाच्या आजूबाजूच्या भागांमधील कनेक्टिव्हिटी सुधारण्याची अपेक्षा आहे.
आरे ते सीप्झ १० रु, एमआयडीसी-अंधेरी २० रु, मरोळ नाका २० रु, विमानतळ टी २ ३० रु, सहार रोड ३० रु, विमानतळ टी१ ३० रु, सांताक्रूझ ४० रु, वांद्रे कॉलनी ४० रु, बीकेसी ५० रु.
संबंधित बातम्या