मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Atal Setu Bridge : किती मजबूत अटल ब्रीज? आयफेल टॉवरच्या १७ पट अधिक स्टील आणि स्टॅच्यू ऑफ लिबर्टीहून ६ पट अधिक काँक्रीट

Atal Setu Bridge : किती मजबूत अटल ब्रीज? आयफेल टॉवरच्या १७ पट अधिक स्टील आणि स्टॅच्यू ऑफ लिबर्टीहून ६ पट अधिक काँक्रीट

Jan 12, 2024 09:50 PM IST

Mumbai Trans Harbour Link : अटल सेतु देशातील सर्वात मोठा पूल होण्याबरोबरच अनेक वैशिष्यांनी युक्त आहे. यामध्ये आयफेल टॉवरच्या तुलनेत १७ पट अधिक स्टील वापरले आहे.

Mumbai Trans Harbour Link
Mumbai Trans Harbour Link

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी भारतातील सर्वात लांब व जगातील १० व्या क्रमाकांच्या लांबीच्या सागरी मार्गाचे लोकार्पण केले. समुद्रावर बनवलेला हा देशातील सर्वात लांब पूल आहे. हा पूल दक्षिण मुंबईतून नवी मुंबईत पोहचण्यासाठी केवळ २० मिनिटांचा वेळ घेईल. यापूर्वी हे अंतर दोन तासांचे होते. 

ट्रेंडिंग न्यूज

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक पूल 'अटल सेतु' नावाने ओळखला जाईल. डिसेंबर २०१६ मध्ये पंतप्रधान मोदींनी याचे भूमिपूजन केले होते. 

अटल सेतु जवळपास २१.८  किलोमीटर लांबीचा व सहा पदरी समुद्री पूल आहे. याची लांबी समुद्रात साडे १६ किलोमीटर तर जमिनीवर ५ किलोमीटर आहे. या पुलासाठी १७,८४० कोटीहून अधिक खर्च झाला आहे. 

हावडा ब्रीजहून ४ पट अधिक स्टील - 
 

अटल सेतु देशातील सर्वात मोठा पूल होण्याबरोबरच अनेक वैशिष्यांनी युक्त आहे. यामध्ये आयफेल टॉवरच्या तुलनेत १७ पट अधिक स्टील वापरले आहे. त्याचबरोबर कोलकाताच्या हावडा ब्रीजहून चार पट अधिक स्टील लागले आहे. या सागरी सेतूसाठी जे काँक्रिट लागले आहे, ते अमेरिकेतील स्टॅच्यू ऑफ लिबर्टीहून सहा पट अधिक आहे. अटल सेतु इतका मजबूत आहे की, भूकंप, सुनामी व वादळी वाऱ्यांचा यावर काहीच परिणाम होणार नाही. याचे निर्माण एपॉक्सी-स्ट्रॅड्स असणाऱ्या विशेष मटेरियलने केले आहे. याचा वापर परमाणु संयंत्रात केला जातो. त्याचबरोबर पृथ्वीच्या ७ प्रदक्षिणा पूर्ण होतील एवढ्या लांबीच्या केबलचा वापर करण्यात आला आहे.

अटल सेतूची वैशिष्ट्ये -

  • हा पुल दक्षिण मुंबईतील शिवडीतून सुरू होऊन नवी मुंबईतील न्हावा शेवापर्यंत जाईल. यामुळे साउथ मुंबई आणि नवी मुंबईपर्यंत जाण्यास लागणार वेळ २ तासाहून कमी होऊन केवळ २० मिनिटे होईल. 
  • हा ब्रीज मुंबईला मुंबई-गोवा हायवे, वसई आणि विरार, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्याशी जोडेल. यामुळे नवीन प्रकल्पांना चालना मिळण्याची शक्यता आहे.
  • अटल सेतू सी लिंकमध्ये दोन्ही बाजूला ६-लेन (3+3 लेन) महामार्ग+१ आपत्कालीन लेन आहे.
  • हा ब्रीज समुद्र सपाटीपासून १५ मीटर उंचीवर बनवला आहे. समुद्राच्या तळात जवळपास ४७ मीटरपर्यंत खोदकाम केले आहे.
  • या पुलासाठी १७,८४० कोटी रुपये खर्च आला आहे. यासाठी १,७७,९०३ मेट्रिक टन स्टील आणि ५,०४,२५३ मेट्रिक टन सिंमेंटचा वापर करण्यात आला आहे. दावा केला जात आहे की, हा ब्रीज १०० वर्षापर्यंत टिकेल. 
  • हा देशातील सर्वात मोठा पूल तसेच समुद्रावर बनवलेला सर्वात मोठा पूल आहे. 
  • या पुलावर ऑटोमेटेड टोल कलेक्शन आणि इंटेलिजेंट ट्रान्सपोर्ट सिस्टमही आहे. 
  • या पुलाच्या निर्मितीसाठी लांब-लांब ऑर्थोट्रॉपिक स्टील डेकचा वापर करण्यात आला आहे. यामुळे पुल बनवण्यासाठी अधिक पिलची गरज भासत नाही. 
  • याचा फायदा हा होतो की, यामुळे समुद्री मार्गाने येताना कोणताही अडथळा येत नाही. याचा भारतात पहिल्यांदाच वापर करण्यात आला आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४