Mumbai Traffic Updates: आषाढी एकादशीनिमित्त वाहतूक मार्गात बदल, दादर आणि वडाळ्यातील ‘हे’ प्रमुख रस्ते राहणार बंद!
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Traffic Updates: आषाढी एकादशीनिमित्त वाहतूक मार्गात बदल, दादर आणि वडाळ्यातील ‘हे’ प्रमुख रस्ते राहणार बंद!

Mumbai Traffic Updates: आषाढी एकादशीनिमित्त वाहतूक मार्गात बदल, दादर आणि वडाळ्यातील ‘हे’ प्रमुख रस्ते राहणार बंद!

Published Jul 15, 2024 09:15 PM IST

Mumbai Traffic Update : आषाढीनिमित्त वडाळ्यातील विठ्ठल मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होत असते. यामुळे दादर आणि वडाळा भागातील अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहेत.

आषाढी एकादशीनिमित्त वाहतूक मार्गात बदल
आषाढी एकादशीनिमित्त वाहतूक मार्गात बदल

Mumbai Traffic Updates : बुधवारी १७ रोजी आषाढी एकादशी यात्रेच्या अनुषंगाने विठ्ठल मंदिर (प्रति पंढरपुर), वडाळा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. यामुळे सदर परिसरातील रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुढीलप्रमाणे वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. पंढरपूरसोबतच राज्यातील अनेक ठिकाणी प्रतिपंढरपूर मंदिरात भाविकांची गर्दी होत असते.

आषाढीनिमित्त (aashadi Ekadashi) वडाळ्यातील विठ्ठल मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होत असते. यामुळे दादर आणि वडाळा भागातील अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहेत. सूचनेनुसार, खालील वाहतूक नियम १६ जुलै रोजी संध्याकाळी ७ वाजता सुरू होतील आणि १८ जुलै रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत लागू राहतील. जे रस्ते बंद केले जातील किंवा 'नो एंट्री' घोषित केले जातील ते खालीलप्रमाणे आहेत.

  • पहिला मार्ग - दादर टीटी जंक्शन ते कात्रक रोज जंक्शनपर्यंतचा टिळक रोज वाहतुकीस बंद राहील
  • पर्यायी मार्ग - टिळक पुलावरून येणारी वाहतूक खोदादाद/ दादर टीटी सर्कल पासून डॉ. बी ए रोडवर उत्तर वाहिनीने रुईया जंक्शन मार्ग वळविण्यात येईल.
  • बंद मार्ग -  मंचरजी जोशी रोड आणि जाम-ए-जमशेदजी रोड या रस्त्यांच्या जंक्शनसह फाइव्ह गार्डन आणि टिळक रोडच्या जंक्शनपर्यंत - दक्षिण आणि उत्तर सीमा दोन्ही बंद राहतील. 
  • बंद मार्ग -कात्रक रोड ते देवी बरेटो सर्कल, आणि जीडी आंबेडकर मार्गाचे जंक्शन, टिळक रोड - दक्षिण आणि उत्तरेकडील) बंद राहतील.  
  • बंद मार्ग - सरफेरे चौकाकडून येणारा जीडी आंबेडकर मार्ग म्हणजेच जीडी आंबेडकर मार्ग आणि नायगाव क्रॉस रोड (एमएमजीएस मार्ग) कात्रक रोडकडे जाणारा जंक्शन बंद राहील.
  • बंद मार्ग -सरफरे चौकाकडून उत्तरेकडे येण्यासाठी जीडी आंबेकर मार्ग वाहतुकीसाठी खुला राहील. (जीडी आंबेकर मार्ग व नायगाव क्रॉस रोड अथवा मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय मार्ग जंक्शनपासून कात्रक रोडपर्यंत)
  • सहकार नगर गल्लापासून टिळक रोड विस्तारीत हा (पूर्वकडून पश्चिमेकडे) वाहतुकीसाठी बंद राहील.
  • लेडी जहाँगिर रोड जंक्शनपासून व कात्रक रोड जंक्शनपर्यंत पारशी कॉलनी नं. १३ व रोड नंबर १४ हे बंद राहतील.
  • दिनशॉ रोड आणि मंचरजी जोशी मार्ग आणि कात्रक रोडचे जंक्शन बंद राहणार आहे.

अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांचा विवाह लावणाऱ्या गुरुजींचं मानधन किती? आकडा वाचून व्हाल थक्क

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर