मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Traffic : मुंबईत प्रजाकसत्ताक दिनी वाहनाने प्रवास करणार आहात? तर ही नियमावली वाचा..

Mumbai Traffic : मुंबईत प्रजाकसत्ताक दिनी वाहनाने प्रवास करणार आहात? तर ही नियमावली वाचा..

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 25, 2023 06:16 PM IST

Mumbai Trafficpolice advisory : प्रजासत्ताक दिनी सार्वजनिक सुट्टी असल्याने मुंबईत वाहतुकीची कोंडी होते. यामुळे मुंबई वाहतूक पोलिसांनी एक दिवसासाठी वाहतुकीचे खास नियोजन केले असून याची नियमावली जारी केली आहे.

Mumbai Traffic police advisory
Mumbai Traffic police advisory

Mumbai Traffic advisory : प्रजाकसत्ताक दिनी उद्या (गुरुवार) सार्वजनिक सुटी  असल्यामुळे  बहुतांश मुंबईकर फिरायला बाहेर पडतात. यामुळे मुंबईत वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. या समस्येपासून नियंत्रण मिळवण्यासाठी प्रजाकसत्ताक  दिनाच्या पार्श्वभूमीवर  मुंबई वाहतूक पोलिसांनी अॅडव्हायझरी जाहीर केली आहे. गुरुवारी दादर जवळील शिवाजी पार्कजवळील सर्व रस्ते वाहनांसाठी बंद करण्यात येणार आहेत, अशी माहिती वाहतूक  पोलिसांनी  दिली आहे.

वाहतूक पोलिसांकडून जारी करण्यात आलेल्या नियमावलीत म्हटले आहे की, प्रजासत्ताक दिनी दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर परेडचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे शिवाजी  पार्कच्या आजूबाजूचे सर्व रस्ते सकाळी ६ वाजल्यापासून रात्री गर्दी ओसरेपर्यंत बंद  ठेवण्यात  येणार आहे.

मुंबईतील अनेक रस्ते १२ तासांसाठी  बंद ठेवण्यात येणार आहेत.  यामुळे या रस्त्यावरील  वाहतूक  तात्पुरत्या स्वरुपात अन्य मार्गावरून वळविण्यात येणार आहे.

प्रजासत्ताक दिनी मुंबईतील वाहतूक व्यवस्थापन खालीलप्रमाणे असेल -

  • एन. सी केळकर रोड आणि केळुस्कर रोड एल. जे. रोड जंक्शन (गडकरी जंक्शन)  पासून  दक्षिण आणि उत्तर जंक्शनपर्यंत वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद राहील.
  • केळुसकर रोड पूर्वेकडील वाहनांच्या वाहतुकीसाठी एकेरी मार्ग राहणार आहे. त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर रस्त्यावरील वाहतूक या मार्गाने येण्यास परवानगी असेल.
  • केळुस्कर रोडवरील मीनाताई ठाकरे पुतळ्यापासून उत्तरेकडील उजव्या वळणाकडून पश्चिमेकडे जाणाऱ्या वाहनांच्या वाहतुकीसाठी एकेरी मार्ग असेल.
  • एस. के. बोले रोड हा सिद्धिविनायक जंक्शन ते हनुमान मंदिरापर्यंतचा एकेरी मार्ग असेल.
  • स्वातंत्र्यवीर सावरकर रस्ता हा सिद्धिविनायक जंक्शन ते येस बँकेपर्यंत एकेरी मार्ग असेल.
  • सिद्धिविनायक जंक्शनकडून स्वातंत्र्यवीर सावरकर रस्त्याने जाणाऱ्या वाहनांना डावीकडे वळण घ्यावे लागणार आहे. अर्थात वाहने गोखले रोड-गडकरी जंक्शन-एलजे रोड राजा बडे  चौक  मार्गे पश्चिम उपनगराकडे जातील
  • येस बँक जंक्शन ते सिद्धिविनायक जंक्शनपर्यंत वाहनांना वाहतुकीस प्रवेश नसणार आहे. त्यामुळे वाहन चालकांना उपलब्ध पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे.

IPL_Entry_Point