Mumbai Traffic News : मुंबईत आज गणपती आगमन मिरवणुकांमुळे 'हे' रस्ते राहणार वाहतुकीसाठी बंद; वाचा
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Traffic News : मुंबईत आज गणपती आगमन मिरवणुकांमुळे 'हे' रस्ते राहणार वाहतुकीसाठी बंद; वाचा

Mumbai Traffic News : मुंबईत आज गणपती आगमन मिरवणुकांमुळे 'हे' रस्ते राहणार वाहतुकीसाठी बंद; वाचा

Updated Aug 31, 2024 08:51 AM IST

Mumbai Traffic News : मुंबईत आज सुट्टीच्या दिवशी काही मंडळे हे लाडक्या गणरायला घेऊन येणार आहेत. यामुळे मिरवणुका काढल्या जाणार असल्यानं मुंबईतील काही रस्ते हे बंद करण्यात आले आहे

मुंबईत आज गणपती आगमन मिरवणुकांमुळे 'हे' रस्ते राहणार वाहतुकीसाठी बंद; वाचा
मुंबईत आज गणपती आगमन मिरवणुकांमुळे 'हे' रस्ते राहणार वाहतुकीसाठी बंद; वाचा

Mumbai Traffic News : गणेशोत्सव येत्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. आज मुंबईतील अनेक मंडळे गणेशमूर्ती मंडळात आणणार आहेत. त्यामुळे आज शहरातील काही भागात आगमन मिरवणुका काढल्या जाणार आहे. यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी काही रस्त्यावरील वाहतूक ही वळवली आहे. या बाबत मुंबई वाहतूक पोलिसांनी एक्सवर पोस्ट देखील केली आहे.

मुंबई वाहतुक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यावर्षी गणेशोत्सव ७ सप्टेंबर पासून सुरू होतो आहे. यामुळे मुंबईतील अनेक मोठी मंडळे ही आपल्या लाडक्या गणरायाला आज घेऊन जाणार आहेत. या साठी शहरातून विविध वैभवी आगमन मिरवणुका काढल्या जाणार आहेत. या चिंतामणी आगमन मिरवणुकीमुळे लालबाग, परळ भागात आज शनिवारी आणि उद्या रविवारी गर्दी होण्याची शक्यता असल्याने प्रवाशांनी लालबाग, परळ (डॉ. बी.ए. आंबेडकर रोडने) जाणे टाळावे. तर बॅ. नाथ पै, रफी किडवाई रोड, ना. म. जोशी, साने गुरुजी मार्गाचा वापर करावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

आज दुपार पासून या मिरवणुका सुरू होणार आहे. चिंचपोकळी येथे दुपारी २ वाजता मिरवणुका सुरू होणार आहे. यानिमित्ताने गणेश टॉकीज, (परब चौक) साने गुरुजी मार्गे-गॅस कंपनी जंक्शन- डॉ. बी. ए. रोड- दक्षिण वाहिनी सरदार हॉटेल जंक्शन दत्ताराम लाड मार्ग ते चिंचपोकळीतील मंडळाच्या मंडपापर्यंत मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मार्गावरची कोंडी टाळण्यासाठी येथील वाहतूक ही वळवण्यात आली आहे.

हे मार्ग वाहतुकीसाठी राहणार बंद

डॉ. बी. ए. रोड, उत्तर वाहिनी हंसराज राठोड चौक (बावला कंपाऊंड जंक्शन) ते कॉम्रेड कृष्णा देसाई चौक (भारतमाता जंक्शन) वाहतुकीसाठी बंद ठेवला जाणार आहे.

डॉ. बी. ए. रोड, दक्षिण वाहिनी कॉम्रेड कृष्णा देसाई चौक (भारतमाता जंक्शन) ते हंसराज राठोड चौक (बावला कंपाऊंड जंक्शन) मार्ग बंद राहणार आहे.

साने गुरुजी मार्ग कॉम्रेड गणाचार्य जंक्शन (चिंचपोकळी जंक्शन) ते संत जगनाडे महाराज चौकापर्यंत (गॅस कंपनी). मार्ग बंद राहणार आहे.

- ना. म. जोशी मार्ग - गुलाबराव गणाचार्य चौक (चिंचपोकळी जंक्शन) ते गंगाराम तळेकर चौक (एस. ब्रिज. जंक्शन). मार्ग बंद राहणार आहे.

- महादेव पालव मार्ग एक दिशा आहे. तसेच शिंगटे मास्तर चौक ते कॉम्रेड कृष्णा देसाई चौक (भारतमाता जंक्शन) मार्ग बंद राहील.

हे आहेत पर्यायी मार्ग

डॉ.बी.ए. रोड, दक्षिण वाहिनीवरून सीएसएमटीकडे जाणारी वाहने लालबाग ब्रिजचा वापर करतील.

डॉ.बी.ए. रोड, उत्तर वाहिनीवरील वाहने हंसराज राठोड चौक (बावला कंपाऊंट जंक्शन) - उजवे वळन - टि.बी कदम मार्ग - जी.डी आंबेडकर मार्ग - श्री साईबाबा रोड मार्ग - भारतमाता जंक्शनकडे जातील.

दक्षिण वाहिनीवरील वाहने कॉम्रेड कृष्णा देसाई चौक (भारतमाता जंक्शन) - उजवे वळण - करी रोड - ब्रिज - शिंगटे मास्तर चौक - डावे वळण - एन. एम. जोशी मार्ग - कॉम्रेड गणाचार्य जंक्शन (चिंचपोकळी जंक्शन) - अब्दुल हमिद अन्सारी चौक (खडा पारसी) इथून दक्षिण मुंबीईकडे जातील.

दक्षिण वाहिनीवरील वाहने कॉम्रेड कृष्णा देसाई चौक (भारतमाता जंक्शन) - डावे वळण घेवून - जिजीभाई लेन - सदाशिव गोपाळ नाईक चौक - श्री साईबाबा मार्ग - साई बाबा टी जंक्शन - डावे वळण - जी. डि. आंबेकर स्लीप रोड - व्हेटरनरी कॉलेज गेट - उजवे वळण - जी. डी. आंबेकर मार्ग - श्रावण यशवंते चौक - बॅरीस्टर नाथ पै मार्ग - पी डिमेला रोमने दक्षिण मुंबईकडे जातील.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर