दादरच्या भाजी विक्रेत्याने कसा उघडकीस आणला टोरेस ज्वेलर्स फसवणूक घोटाळा? गुंतवले होते तब्बल ४ कोटी
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  दादरच्या भाजी विक्रेत्याने कसा उघडकीस आणला टोरेस ज्वेलर्स फसवणूक घोटाळा? गुंतवले होते तब्बल ४ कोटी

दादरच्या भाजी विक्रेत्याने कसा उघडकीस आणला टोरेस ज्वेलर्स फसवणूक घोटाळा? गुंतवले होते तब्बल ४ कोटी

Jan 08, 2025 10:40 AM IST

Torres Company Scam : मुंबईतील टोरेसच्या बोगस योजनांमध्ये अनेक सामान्य मुंबईकरांनी गुंतवणूक केली. मात्र, कंपनीने मुंबईतील सर्व आउटलेत बंद करत गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचं उघडं झालं आहे. हा संपूर्ण घोटाळा एका भाजीविक्रेत्याने उघडकीस आणला आहे.

दादरच्या भाजी विक्रेत्याने कसा उघडकीस आणला टोरेस ज्वेलर्स फसवणूक घोटाला ? गुंतवले होते तब्बल ४ कोटी
दादरच्या भाजी विक्रेत्याने कसा उघडकीस आणला टोरेस ज्वेलर्स फसवणूक घोटाला ? गुंतवले होते तब्बल ४ कोटी

Torres Company Scam : मुंबईत लवकरच श्रीमंत होण्याच्या नादात तब्बल ३ लाख मुंबईकरांना तब्बल ३ हजार कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या टोरेस कंपनीच्या तिघांना अटक करण्यात आली आहे. यात एका रशियन व्यक्तिचा समावेश आहे. या कंपनीत अनेकांनी आपली जमापुंजी गुंतवली. अनेकांना २०० ते ५०० रुपयांचे हीरे ७ हजारांचे असल्याचे सांगून परतावा दिल्याच्या बहाण्याने फसवलं. हा सर्व फसवणुकीचा प्रकार दादर येथील एका भाजीपाला विक्रेत्याने उघडकीस आणला आहे. या व्यक्तिने तब्बल ४ कोटी रुपयांची गुंतवणूक या कंपनीत केली होती.

मुंबईतील टोरेसच्या बोगस योजनांमध्ये अनेक सामान्य मुंबईकरांनी गुंतवणूक केली. मात्र, गेल्या काही दिवसांपासून टोरेस कंपनीने परतावा देण्याचे थांबवले होते. मुंबई, नवी मुंबई अन् मीरा रोड, दादर परिसरातील कार्यालयांना टाळं लावून कंपनीचे कर्मचारी फरार झाले. दरम्यान, दादरच्या कार्यालयातून रक्कम, दागिने घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. दादरमध्ये फुटपाथवर भाजी विकणाऱ्या एका भाजी विक्रेत्याने टोरेस कंपनींचा घोटाळा उघडकीस आणला. या भाजीविक्रेत्याने तब्बल ४ कोटी रुपयांची गुंतवणूक या कंपनीत केली होती.

परतावा म्हणून दिले खोटे हीरे

या कंपनीत गुंतणूक करणाऱ्यांना त्यांनी भरलेल्या रकमेच्या दहा टक्के पैसे दर आठवड्याला मिळणार असल्याची बतावणी कंपनी मार्फत करण्यात आली होती. सुरवातीचे काही दिवस अनेकांना मोठ्या प्रमाणात परतावा देण्यात आला. काहींना भेट वस्तु म्हणून हीरे देण्यात आले. हे हीरे महाग असल्याचं खोटं सांगण्यात आलं. काही महिन्यापर्यंत नागरिकांचे पैसे देखील फेडण्यात आले. अनेकांनी या कंपनीत १० लाखांपासून ५० लाखपर्यंत गुंतवणूक केली. मात्र, त्यांची फसवणूक झाल्याचं आता उघड झालं आहे.

दादरच्या भाजीपाला विक्रेत्याने घोटाळा केला उघड

दादर येथे भाजी विकणारे प्रदीपकुमार वैश्य (वय ३१) या तरुणाने देखील या कंपनीत मोठी गुंतवणूक केली होती. तब्बल ४ कोटी रुपये वैश्य यांनी या कंपनीत गुंतवले होते. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच प्रदीपकुमार वैश्य यांनी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात धाव घेत कंपनी विरोधात तक्रार दाखल केली. दादरच्या टोरेस शोरूमसमोर प्रदीप यांचं भाजीपाल्याचं दुकान असून येथे होणारी गर्दी पाहून त्यांनी या कंपनीत मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवले. पैसे गुंतवल्यास या ठिकाणी हीरे मिळत असल्याने व व्याज देखील मोठे मिळत असल्याने त्यांनी कंपनीत गुंतवणूक केली.

सुरवातीला प्रदीपकुमार वैश्य यांनी ६ लाख ७० हजार गुंतवले. त्यानंतर दोन-तीन महिने वेळेत परतावा मिळाला. मात्र, त्यानंतर जास्त परतावा मिळायला लागण्याने त्यांनी अनेकांना याची माहिती देत त्यांच्या कडून पैसे घेत तर आपले घर गहाण ठेवून तब्बल ४ कोटी २७ हजार रूपयांची गुंतवणूक केली. मात्र, त्यानंतर त्यांच्या गुंतवणुकीवर परतावा देण्याचे बंद केल्याने आपली फसवणूक झाल्याचे समजतात प्रदीपकुमार यांनी पोलिसांत तक्रार दिली.

२१ जून २०२४ ते ३० डिसेंबर २०२४ दरम्यान फसवणूक झाल्याचा आरोप वैश्य यांनी केला आहे. वैश्य आणि इतर सहा गुंतवणूकदारांनी त्यांची फसवणूक झाल्याची तक्रार नोंदवली. प्लॅटिनम हर्न प्रा. लि.ने मोइसनाइट स्टोनमधील गुंतवणुकीद्वारे उच्च परतावा देण्याचे आधी मान्य केले होते. गुंतवलेल्या रकमेवर साप्ताहिक ६ टक्के परतावा देण्याचे ठरले होते. सुरुवातीला, कंपनीने परतावा दिला. गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन केला. मात्र, मूळ रकमेसह परतावे देण्याचे कंपनीने ३० डिसेंबर २०२४ रोजी थांबली. वैश्य यांनी केलेल्या तक्रारीमुळे नंतर मोठ्या प्रमाणात अनेक गुंतवणूकदार दादर कार्यालयाबाहेर जमले. यामुळे या घोटाळ्याला वाचा फुटली.

प्लॅटिनम हरेन प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत कार्यरत असलेल्या या कंपनीची नोंद २०२३ मध्ये करण्यात आली होती. या कंपनीने २०२४ मध्ये दादरमध्ये एक मोठे आउटलेट उघडले. त्यानंतर मीरा-भाईंदरसह इतर ठिकाणी देखील आउटलेट उघडण्यात आले. यात टोरेस ज्वेलरीने सोने, चांदी आणि मॉइसॅनाइट खरेदीवर मोठा परतावा देखील देण्याचे आमिष दाखवले. त्यामुळे अनेकांनी या कंपनीत गुंतवणूक केली. मात्र, त्यांचे पैसे बुडल्याचे उघड झालं आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर