Mumbai Rain: मुंबईत येत्या दोन दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता; शनिवारी झाली 'इतक्या' पावसाची नोंद!
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Rain: मुंबईत येत्या दोन दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता; शनिवारी झाली 'इतक्या' पावसाची नोंद!

Mumbai Rain: मुंबईत येत्या दोन दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता; शनिवारी झाली 'इतक्या' पावसाची नोंद!

Jun 23, 2024 09:16 PM IST

Mumbai Weather News: मुंबईत शनिवारी सकाळी आठ वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत शहरात सर्वत्र पावसाने हजेरी लावली. हाजी अली, ग्रँट रोड, सँडहर्स्ट रोड, मरोळ आणि अंधेरी पश्चिम या भागात सर्वाधिक २० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

Areas like Naupada in Thane, Daulat Nagar and Kopri received the most rain, between 20 to 30mm. (Praful Gangurde / HT Photo)
Areas like Naupada in Thane, Daulat Nagar and Kopri received the most rain, between 20 to 30mm. (Praful Gangurde / HT Photo)

Mumbai Weather Updates: मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आज दिवसभर ढगाळ वातावरण आणि हलका ते मध्यम पाऊस पडेल. तसेच दक्षिण-नैऋत्येकडून ५.६ किमी/ताशी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर मुंबईत येत्या दोन दिवसांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

आयएमडी मुंबईच्या शास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी सांगितले की, पश्चिमेकडील वाऱ्यांचा जोर वाढत असल्याने मुंबईत बहुतेक वेळा मध्यम पाऊस पडेल आणि तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. मात्र, २५ ते २७ जून दरम्यान शहरात मुसळधार पावसाची दाट शक्यता आहे.

मुंबईत शनिवारी सकाळी ०८.०० ते रात्री ०८.०० वाजेपर्यंत शहरात सर्वत्र पावसाने हजेरी लावली असून हाजी अली, ग्रँट रोड, सँडहर्स्ट रोड, मरोळ आणि अंधेरी पश्चिम या भागात सर्वाधिक २० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर, कुलाबा, भायखळा, मलबार हिल, वरळी, विलेपार्ले, वर्सोवा, सांताक्रूझ, अंधेरी पूर्व आणि जोगेश्वरी अशा अनेक ठिकाणी १० ते २० मिमी पाऊस झाला. ठाण्यातील नौपाडा, दौलत नगर, कोपरी या भागात सर्वाधिक २० ते ३० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

सांताक्रूझ स्थानकात शनिवारी कमाल तापमान ३१.९ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २६ अंश सेल्सिअस नोंदले गेले. तर कुलाबा येथे कमाल तापमान ३१.६ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २६.४ अंश सेल्सिअस नोंदले गेले. आर्द्रता अनुक्रमे ७९ व ८४ टक्के होती.

राजधानीच्या काही भागात पावसाची हजेरी

राजधानी क्षेत्राच्या काही भागात रविवारी दुपारी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने गेल्या दोन महिन्यांपासून उकाड्याचा सामना करत असलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.भारतीय हवामान शास्त्र विभागाने आठवड्याच्या अखेरीस दिल्ली आणि एनसीआरच्या काही भागात अंशत: ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज वर्तवला आहे.

देशातील अनेक भागात पाऊस

उत्तर प्रदेशातील नोएडाच्या काही भागातही पावसाने हजेरी लावली. उत्तराखंडची राजधानी डेहराडूनमध्ये दिवसभर पावसाने हजेरी लावली. मान्सून ईशान्य भारतातील अनेक भागांत पुढे सरकण्याची शक्यता आहे. नैर्ऋत्य मोसमी वारे उत्तर अरबी समुद्र आणि गुजरात राज्याच्या आणखी काही भागांमध्ये पुढे जाण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे, असे आयएमडीच्या अहवालात म्हटले आहे. गुजरातमध्ये २४ जूनपर्यंत तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर