Mumbai : रेल्वे रुळ ओलांडताना अपघात, १६ वर्षीय मुलीचा मृत्यू, सीवूड्स स्थानकावरील घटना
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai : रेल्वे रुळ ओलांडताना अपघात, १६ वर्षीय मुलीचा मृत्यू, सीवूड्स स्थानकावरील घटना

Mumbai : रेल्वे रुळ ओलांडताना अपघात, १६ वर्षीय मुलीचा मृत्यू, सीवूड्स स्थानकावरील घटना

Published Oct 23, 2024 08:47 AM IST

Mumbai Local: सीवूड्स स्थानकात रुळ ओलांडताना रेल्वेच्या धडकेत एका १६ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली.

रेल्वे रुळ ओलांडताना रेल्वेच्या धडकेत १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
रेल्वे रुळ ओलांडताना रेल्वेच्या धडकेत १६ वर्षीय मुलीचा मृत्यू

Mumbai News: नवी मुंबईतील सीवूड्स स्थानकात पायऱ्या वापरण्याऐवजी रेल्वे रुळ ओलांडण्याच्या प्रयत्नात एका १६ वर्षीय मुलीचा लोकलच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. या अपघातामुळे हार्बर मार्गावरील वाहतूक सुमारे अर्धा तास विस्कळीत झाली, अशी माहिती जीआरपीच्या एका अधिकाऱ्याने दिली.

मृत सना अब्दुल सिद्दीकी ही गोवंडी येथील रहिवासी असून भंगार व्यापाऱ्याची मुलगी आहे. इंग्रजी भाषा आणि संगणक प्रशिक्षणाच्या कोचिंग क्लासला जाताना असताना अशी दुर्दैवी घटना घडली. दरम्यान, मंगळवारी सकाळी ११ वाजता ती गोवंडीहून पनवेलकडे जाणाऱ्या ट्रेनमध्ये बसली. दुपारी १२ वाजता ती सीवूड्स रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म २ वर उतरली आणि पूर्वेकडे जाण्यासाठी तिने प्लॅटफॉर्म १ वर रुळ ओलांडण्याचा प्रयत्न केला. सीएसटीकडे जाणारी गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर येत आहे, याची तिला कल्पना नव्हती आणि भरधाव वेगाने जाणाऱ्या लोकलने तिला धडक दिली.

या घटनेत मुलगी गंभीर जखमी झाली असून तिला पालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तेथे तिला मृत घोषित करण्यात आले. वाशी जीआरपीने अकस्मात मृत्यूची नोंद केली. जीआरपी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या आर्थिक वर्षात वाशी जीआरपी अंतर्गत १०५ अपघात झाले आहेत. यामध्ये गोवंडी ते सीवूड्स आणि तुर्भे ते रबाळे या ११ स्थानकांचा समावेश आहे.

मुंबई: लोकलमधून पडल्याने एका महिलेचा मृत्यू

मध्य रेल्वेच्या अंबरनाथ आणि बदलापूर दरम्यान कर्जत लोकलमधून पडून एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास घडली. पाय ठेवायलाही जागा नसताना संबंधित महिला लोकलमध्ये चढली आणि दाराजवळ उभी असताना तिचा हात सटकल्याने ती खाली पडली. त्यानंतर तिला जखमी अवस्थेत उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात नेले. मात्र, तिथे डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. ऋतुजा गणेश जंगम, असे मृत महिलेचे नाव आहे. ऋतुजा ही कामावरून घरी जात असताना अशी दुर्दैवी घटना घडली. 

मुंबई: लोकलमधून पडून २० वर्षीय तरुणाचा मृत्यू

मुंबई लोकलमधून पडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना गेल्या आठवड्यात मंगळवारी घडली. डोंबिवली ते कोपर रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडली. मृत तरुण मुंबई लोकलच्या दरवाजाजवळ उभा होता. मात्र, गर्दीमुळे अचानक त्याचा हात सटकला आणि तो धावत्या लोकलमधून खाली पडला.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर