Mumbai Taxi Fare Hike: मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी आहे. मुंबईकरांचा प्रवास आता महगणार आहे. ऑटो रिक्षा व टॅक्सीच्या भाड्यात वाढ करण्याचा निर्णय संघटनांनी घेतला आहे. इंधनाचे वाढते भाव व खटुआ समितीच्या शिफारशींचा दाखला समोर करत ही भाडेवाढ केली जाणार आहे. त्यानुसार टॅक्सीचे भाडे ४ रुपये प्रति किमी तर रिक्षाचे भाडे ३ रुपये प्रति किमीने वाढवण्यासाठी संघटना आग्रही असून असे झाल्यास रिक्षाचे किमान भाडे २३ वरून २६ रुपये तर टॅक्सीच्या भाडे २८ वरून ३२ रुपये प्रती किलोमीटर होण्याची शक्यता आहे.
मुंबईत प्रामुख्याने नागरिक लोकलनंतर रिक्षा आणि टॅक्सीने प्रवास करत असतात. मात्र, त्यांचा हा प्रवास आता महागणार आहे. सध्या मुंबईत मोबाइलवरून रिक्षा आणि टॅक्सीची बूकिंग मोठ्या प्रमाणात प्रवाशांकडून केले जात आहे. याचा परिणाम रिक्षा चालकांवर होत आहे. यात रिक्षा-टॅक्सीचा देखभाल दुरुस्तीचा खर्च देखील वाढला आहे. त्यात सीएनजीच्या दरात देखील मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे भाडेवाढ करण्यात यावी अशी शिफारश खटुआ समितीने केली होती. त्यामुळे ही भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव संघटनेकडून आरटीओसंबधित विभागाला पाठवण्यात आला आहे.
या पूर्वी २०२२ मध्ये रिक्षा दरवाढ झाली होती. त्यावेळी रिक्षाचा दर २१ होते त्यात दोन रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्यामुळे २३ रुपये रिक्षाचे भाडे करण्यात आले होते. तर टॅक्सीचा दर २५ रुपयांवरून तीन रुपयांनी वाढून २८ रुपये करण्यात आला. होता. त्यामुळे आता यावर्षी ४ रुपये दरवाढ संघटनांनी प्रस्तावित केली आहे. त्यानुसार रिक्षाचे भाडे हे २३ वरून २७ होणार आहे. किलोमीटर साठी मुंबईकरांना २८ तर टॅक्सीसाठी ३२ रुपये मोजावे लागणार आहे. खटुआ समितीच्या शिफारसीनुसार दरवर्षी रिक्षा-टॅक्सी भाडे दर ठरवणे,व त्यात बदल करण अपेक्षित आहे.
मुंबईतील टॅक्सी यूनियनचे नेते ए.एल. क्वाद्रोस म्हणाले, आम्ही यापूर्वीच संबंधित यंत्रणांना टॅक्सीच्या भाड्यामध्ये ४ रुपयांची वाढ करण्याबाबत विनंती केली आहे. त्यामुळे नव्या दारवाढीत एका किलोमीटरसाठी किमान ३२ रुपये प्रवाशांना द्यावे लागणार आहे. ऑटो रिक्षा यूनियनचे थम्पी कुरिअन म्हणाले, उपनगरातील ऑटो रिक्षाचा १ किलोमीटर अंतराच्यासाठी किमान रक्कम २३ रुपयांवरुन २६ रुपयांवर न्यावी, अशी विनंती आम्ही केली आहे. ही मागणी खटुआ समितीच्या शिफारशींवर केली असल्याचे ते म्हणाले.
संबंधित बातम्या