मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Electric Vehicle: इलेक्ट्रिक वाहनधारकांसाठी खुशखबर! बेस्ट डेपोमध्ये मिळणार चार्जिंगची सुविधा; जाणून

Electric Vehicle: इलेक्ट्रिक वाहनधारकांसाठी खुशखबर! बेस्ट डेपोमध्ये मिळणार चार्जिंगची सुविधा; जाणून

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Feb 13, 2023 10:16 AM IST

Electric Vehicle Charging Facility: इलेक्ट्रिक वाहनधारकांना आता बेस्ट डेपोमध्येही वाहनांना चार्जिंग करता येणार आहे.

BEST
BEST

BEST Electricity: बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट्स म्हणजेच बेस्टच्या डेपोमध्ये लवकरच इलेक्ट्रिक वाहनांना चार्जिंग करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. बेस्टने ५५ ठिकाणी सुमारे ३३० ई-चार्जिंग स्टेशन स्थापित करण्याचे काम सुरु केले आहे. या महिन्याच्या शेवटपर्यंत बेस्टच्या काही ई चार्जिंग सुविधा उपलब्ध होतील, अशी अपेक्षा आहे. बेस्टच्या ई-चार्जिंग स्थानकावर खाजगी कार, दुचाकी आणि शाळेच्या बसला चार्जिंग करता येणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या महिन्याच्या अखेरीस बेस्टच्या काही ई-चार्जिंग स्टेशनचे काम पूर्ण होईल. काही ठिकाणी आम्ही कनेक्टिव्हिटीच्या समस्या सोडवण्यासाठी काम सुरू आहे. तर, काही भागात इलेक्ट्रिक आणि मीटर कनेक्शनवर काम केले जात आहे. या ई चार्जिंग स्टेशनवर नागरिक त्यांच्या खाजगी कार, दुचाकी चार्ज करू शकतात. यासाठी नागरिकांकडून पैसे आकरले जातील, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

बेस्टने चार्जिंग स्टेशनसाठी निवडलेल्या ५५ ठिकाणी एकाच वेळी अनेक वाहने चार्ज करण्यासाठी आणि पार्क करण्यासाठी पुरेशी जागा आहे. नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने स्लॉट बूक करता येणार आहे, ज्यामुळे कोणत्या चार्जिंग स्टेशनवर स्लॉट रिकामा आहे, याची वाहनधारकांना योग्य माहिती मिळेल.

एनएससीआय, कुलाबा, बॅकबे, मंत्रालय, संग्रहालय, हिरानंदानी बस स्थानक, तारदेव बस स्थानक, वांद्रे रेक्लेमेशन, वांद्रे (पूर्व) बस स्थानक, माहीम बस स्थानक, वांद्रे (पश्चिम) बस स्थानक, गोरेगाव बस डेपो, गोरेगाव (पश्चिम) बस स्थानक, सात बंगले बस स्थानक आणि वाळकेश्वर बस स्थानकावरील ई-चार्जिंग सुविधांचे काम या महिन्याच्या अखेरीस पूर्ण होण्याची शक्यता आहे.

IPL_Entry_Point

विभाग