मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  SoBo: गुढीपाढवानिमित्त सोबो मार्गावरील वाहतूक वळवली, जाणून घ्या पर्यायी मार्ग

SoBo: गुढीपाढवानिमित्त सोबो मार्गावरील वाहतूक वळवली, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Apr 09, 2024 12:47 PM IST

SoBo Routes To Go Off For Gudi Padwa Rally: गुढीपाढवानिमित्त नववर्ष स्वागत यात्रा मिरवणुक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याने मुंबईतील सोबो मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले.

गुढीपाढवानिमित्त संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबई पोलिसांनी वाहतूक अधिसूचना जारी केली.
गुढीपाढवानिमित्त संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबई पोलिसांनी वाहतूक अधिसूचना जारी केली.

Mumbai Traffic police advisory: हिंदु नववर्ष दिन गुढीपाढवानिमित्त दक्षिण मुंबईतील मार्गांवर संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुबंई वाहतूक पोलिसांनी वाहतूक अधिसूचना जारी केली आहे. गुढीपाढवा निमित्त नववर्ष स्वागत यात्रा मिरवणुक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई वाहतूक पोलिसांनी सकाळी ०६.०० ते दुपारी ०३.०० वाजेपर्यंत निर्बंध जाहीर केले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Gudi Padwa 2024 : गुढीपाडवा शोभा यात्रा व मनसेच्या मेळाव्यामुळे मुंबई-ठाण्यातील वाहतुकीत बदल; अशी असेल वाहतूक

मुंबई वाहतूक पोलिसांनी जारी केलेल्या वाहतूक अधिसूचनेनुसार, मुंबईतील व्ही.पी रोड (सी.पी टँक सर्कलच्या जंक्शनपासून ते नित्यानंद हॉटेलच्या जंक्शनपर्यंत) रहदारीसाठी आणि पार्किंगसाठी बंद असेल. प्रार्थना समाज जंक्शन उर्फ रिलायन्स हॉस्पिटल जंक्शनकडून येणाऱ्या वाहनांना एसव्हीपी रोडवरून प्रवास करावा लागेल.

- एसव्हीपी रोड जंक्शन ते एम.के रोड हा रस्ता वाहतूक आणि पार्किंगसाठी बंद असेल. त्याऐवजी वाहने एस.व्ही.पी रोडच्या दिशने उजव्या बाजूने वळण घेऊ शकतात.

Maharashtra Weather update : राज्यावर अस्मानी संकट! विदर्भात वादळी वाऱ्यासह गारपीटीची शक्यता; असे असेल हवामान

- घोडा गडी जंक्शन ते खट्टर गल्लीपर्यंतचा बी.जे रोड वाहतूक आणि पार्किंगसाठी बंद असेल, त्याऐवजी बी.जे रोड दक्षिण दिशेकडील वाहनांना एम. के रोडच्या दिशेने सरळ जावे.

- गिरगाव चर्च परिसरातील एस.व्ही.पी रोड ते शामलदास गांधी जंक्शनपर्यंतचा जे.एस.एस रोड वाहतूक आणि पार्किंगसाठी बंद राहणार आहे. त्याऐवजी, जे.एस. एस रोड (दक्षिण दिशेला) जाणाऱ्या वाहनांनी डावे वळण घेऊन एम. के रोडकडे आणि त्यानंतर उजवे वळण घेऊन वर्धमान जंक्शनकडे जावे.

Mumbai Family Court : बायकोनं विकत घेतलेल्या घरावर नवऱ्याचा अधिकार नाही! घटस्फोट झाल्यावर घरी जाण्यासही मनाई!

मुंबई वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरील वाहतूक निर्बंध आज (मंगळवारी, ०९) दुपारी ३.०० वाजेपर्यंत लागू असतील. त्यानंतर दुपारी ३ नंतर वाहतूक पूर्वपदावर येईल.

ठाण्यातील वाहतुकीत बदल

ठाण्यातही नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शोभा यात्रा निघणार आहे. यामुळे ठाण्यातील वाहतुकीतही बदल करण्यात आला. कोर्टनाका चौक ते जांभळीनाका व बाजारपेठेच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीस डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ प्रवेशबंदी राहील. या मार्गावरील वाहतूक आनंद आश्रममार्गे, टॉवरनाका, तलावपाळीमार्गावरून पुढे वळवण्यात आली. याचबरोबर खारकरआळीपासून जांभळीनाक्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीत बदल करण्यात आला. महाजनवाडी सभागृहाजवळ प्रवेशबंदी करण्यात आली. या मार्गावरची वाहतूक ही महाजनवाडी सभागृहापासून कोर्टनाकामार्गे वळवण्यात आली.

IPL_Entry_Point

विभाग