मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Vikhroli News:डब्बा द्यायला आलेल्या चिमुकल्याला वडिलांनी थांबवून घेतलं, स्लॅब कोसळून बाप-लेकाचा मृत्यू; व्रिकोळीतील घटना

Vikhroli News:डब्बा द्यायला आलेल्या चिमुकल्याला वडिलांनी थांबवून घेतलं, स्लॅब कोसळून बाप-लेकाचा मृत्यू; व्रिकोळीतील घटना

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jun 10, 2024 09:18 AM IST

Mumbai vikhroli slab collapse accident: मुंबईच्या व्रिकोळी येथे एका इमारतीचे बांधकाम सुरू असतांना इमारतीचा स्लॅब कोसळून सुरक्षारक्षक व त्याच्या दहा वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला.

मुंबईच्या व्रिकोळी येथे एका इमारतीचे बांधकाम सुरू असतांना इमारतीचा स्लॅब कोसळून सुरक्षारक्षक व त्याच्या दहा वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला.
मुंबईच्या व्रिकोळी येथे एका इमारतीचे बांधकाम सुरू असतांना इमारतीचा स्लॅब कोसळून सुरक्षारक्षक व त्याच्या दहा वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला.

Mumbai vikhroli slab collapse accident: मुंबईत मॉन्सूनचे आगमन झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत जोरदार पाऊस सुरू आहे. दरम्यान, या पावसामुळे मुंबईत विक्रोळी येथे रविवारी रात्री दुर्दैवी घटना घडली आहे. व्रिकोळी परिसरातील एका नव्या इमारतीचा स्लॅब कोसळून सुरक्षारक्षक व त्याच्या १० वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. यातील लहान मुलगा हा त्याच्या वडिलांना जेवणाचा डब्बा देण्यासाठी गेला होता. मात्र, पाऊस सुरू असल्याने त्याच्या वडिलांनी त्याला थांबून घेतले. मात्र, इमारतीचा स्लॅब कोसळून दोघांचाही मृत्यू झाला.

ट्रेंडिंग न्यूज

Maharashtra Weather Update : राज्यात आज तूफान बरसणार! 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

मृत वडील हे ३८ वर्षांचे आहेत तर त्यांचा मुलगा हा १० वर्षांचा आहे. त्यांची नावे अद्याप समजू शकली नाही. या दुर्घटनेची माहिती पोलिसांना मिळाली असून पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. कैलास बिझनेस पार्क, टाटा पॉवर हाऊसजवळ, पार्क साइट, विक्रोळी पश्चिम येथे ही घटना घडली.

Eknath shinde : राज्यात सात खासदार असलेल्या शिंदे गटाची एकच राज्यमंत्रीपद देऊन मोदी सरकार ३.० मध्ये बोळवण

मिळालेल्या माहितीनुसार मुंबईत दोन दिवस झाले जोरदार पाऊस सुरू आहे. काल अनेक ठिकाणी पाणी साचले होते. त्यामुळे मुंबईकरांची तारांबळ उडाली होती. दरम्यान, काल रात्री जोरदार पाऊस झाला. या पावसात विक्रोळी येथे एका इमारतीचे बांधकाम सुरू असतांना तेथे सुरक्षा रक्षक म्हणून काम करत असतांना आपल्या वडिलांना जेवणाचा डब्बा देण्यासाठी १० वर्षांचा मुलगा गेला होता. 

Sanjay Raut : नरेंद्र मोदी शपथ घेत असताना काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा खुनी खेळ सुरू होता; संजय राऊत यांची टीका

दरम्यान, या वेळी जोरदार पाऊस सुरू असल्याने वडिलांनी मुलाला थांबून घेतले. याच वेळी अचानक बांधकाम सुरू असलेल्या पहिल्या मजल्याचा स्लॅब कोसळला. या घटनेत स्लॅबच्या ढीगाऱ्या खाली दाबून बाप-लेकाच्या मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच इतर मजुरांनी दोघांना बाहेर काढून त्यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पण, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या इमारतीचे काम नवे असतांना स्लॅब कसा कोसळला हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, याप्रकरणी दोषी असणाऱ्यांवर कारवाई होणार का? या कडे सर्वांचे लागले आहे. तसेच मृतांच्या कुटुंबांना न्याय मिळणार का ? या कडे देखील लक्ष लागले आहे. 

 

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग