Sion ROB Shut Down On March 28: मुंबईतील सायन रोड ओव्हर ब्रिज तोडण्याचा कामाला अखेर मुहूर्त सापडला. मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा सायन रोड ओव्हरब्रिज ११२ वर्षे जुना आहे. जानेवारी महिन्यातच हा पूल पाडण्यात येणार होता. परंतु, स्थानिक लोक आणि राजकीय नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे या कामाला विलंब झाला. आता हा पूल २८ मार्चच्या मध्यरात्रीपासून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुनर्बांधणीच्या कामासाठी हा पूल दोन वर्षांसाठी बंद ठेवला जाणार आहे.
सुरुवातीला २० जानेवारी रोजी पाडण्याचे ठरले होते. स्थानिक रहिवाशांचा विरोध आणि खासदार राहुल शेवाळे यांच्या हस्तक्षेपामुळे ही प्रक्रिया लांबली. नंतर बोर्डाच्या परीक्षांमुळे तारखा पुढे ढकलण्यात आल्या. इयत्ता दहावीची परीक्षा १९ मार्च रोजी संपली. तर, इयत्ता बारावीची परीक्षा येत्या २६ मार्च २०२४ संपणार आहे.
हा पूल बंद झाल्याने पूर्व- पश्चिम वाहतुकीवर परिणाम होण्याची अपेक्षा आहे. सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड सारख्या पर्यायी मार्गांवर संभाव्य गर्दी होऊ शकते. ईस्टर्न एक्स्प्रेस वे आणि एलबीएस मार्ग यांना जोडणारा कुर्ला मार्गे वाहनधारकांना पुन्हा मार्गक्रमण करावे लागेल.
१) कुर्ला मार्गे सांताक्रूझ- चेंबूर लिंक रोड, जो ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला जोडतो.
२) सुलोचना शेट्टी मार्गाने सायन रुग्णालयाच्या दिशेने जाणारा रस्ता, जो धारावीतील डॉ बीए रोड ते कुंभारवाड्याला जोडतो.
३) चुनाभट्टी- वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स कनेक्टर (दुचाकी आणि तीन चाकी वाहनांना परवानगी नाही)
संबंधित बातम्या