मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai: मुंबईतील उपनगरांना जोडणारा सायन रोड ओव्हरब्रिज आजपासून बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Mumbai: मुंबईतील उपनगरांना जोडणारा सायन रोड ओव्हरब्रिज आजपासून बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Jan 17, 2024 08:39 AM IST

Sion RoB Demolish: मुंबईतील ११२ वर्ष जुना सायन रोड ओव्हरब्रिज पाडण्याची तयारी सुरू झाली आहे.

Mumbai Sion Road Bridge
Mumbai Sion Road Bridge

Mumbai Sion Road Bridge: मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा ११२ वर्षे जुना सायन रोड ओव्हरब्रिज आजपासून (बुधवार, १७ जानेवारी २०२३) बंद केला जाणार आहे. ब्रिटिशकालीन हा ऐतिहासिक पूल कोसळल्याने १२ हजारांहून अधिक वाहनचालकांना फटका बसेल, असा अंदाज आहे. यात धारावी, सायन आणि पश्चिम मुंबईत माल पुरवठा करणाऱ्या अवजड वाहनांची संख्या जास्त असेल. दरम्यान, सायन रोड ओव्हरब्रिज बंद झाल्याने त्यासाठी पर्यायी मार्ग कोणते, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

सायन रोड ओव्हरब्रिज हा माहीम, माटुंगा, चुनाभट्टी, बीकेसी, चेंबूर वाहतूक विभागांतर्गत येतो. हा पूल पाडण्यात येणार असल्याने जवळपास ५० ते ६० ट्रॅफिक वॉर्डन तैनात करण्यात आले. तसेच ठिकठिकाणी नवीन वाहतूक वळवण्याबाबत आणि इंडिकेटर्सबाबत लोकांना लाऊडस्पीकर आणि इतर माध्यमातून माहिती दिली जाणार आहे.

सायन रोड ओव्हरब्रिज प्रवास करणाऱ्यांसाठी ३ पर्यायी मार्ग

१) कुर्ला मार्गे सांताक्रूझ- चेंबूर लिंक रोड, जो ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला जोडतो.

ट्रेंडिंग न्यूज

२) सुलोचना शेट्टी मार्गाने सायन रुग्णालयाच्या दिशेने जाणारा रस्ता, जो धारावीतील डॉ बीए रोड ते कुंभारवाड्याला जोडतो.

३) चुनाभट्टी- वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स कनेक्टर (दुचाकी आणि तीन चाकी वाहनांना परवानगी नाही)

वाहतूक सुव्यवस्था राखण्यासाठी परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या पुलाला जोडलेले अनेक मार्ग वळवण्यात आले आहेत. यामुळे वाहनचालकांना आणखी एक ते दीड तास लागू शकतो. ट्रॅफिक हेल्पलाइन नंबर आणि ट्रॅफिक पोलिसांच्या विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व्यतिरिक्त स्थानिक वाहतूक विभागांद्वारे चालकांना मार्गदर्शन केले जाईल.

WhatsApp channel
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर