मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sion hospital doctor news : ताप आला म्हणून स्वत:च अँटिबायोटिक सलाईन लावलं, रिअ‍ॅक्शन झाल्यानं निवासी डॉक्टराचा मृत्यू

Sion hospital doctor news : ताप आला म्हणून स्वत:च अँटिबायोटिक सलाईन लावलं, रिअ‍ॅक्शन झाल्यानं निवासी डॉक्टराचा मृत्यू

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Mar 05, 2024 11:48 AM IST

Mumbai Sion Hospital News: मुंबईच्या सायन रुग्णालयातील निवासी डॉक्टरचा अँटिबायोटिक सलाईनमुळे मृत्यू झाला.

Death (Representative Image)
Death (Representative Image)

Mumbai: मुंबईच्या सायन येथील लोकमान्य टिळक वैद्यकीय रुग्णालयात निवासी डॉक्टराचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ माजली. रुग्णालय प्रशासनाने केलेल्या चौकशीत निवासी डॉक्टरने ताप आल्याने स्वत:ला अँटिबायोटिक सलाईन लावले. मात्र, त्याचे रिअ‍ॅक्शन झाल्यानं त्याचा मृत्यू झाला, असे सांगण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सौरभ धुमाळ असे मृत्यू झालेल्या निवासी डॉक्टराचे नाव आहे. डॉ. धुमाळ हे मूळचे परभणी जिल्ह्यातील असून सायन येथील लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या शल्यचिकित्सा विषयाच्या दुसऱ्या वर्षाला शिकत होते. डॉ. धुमाळ हे गुरुवारी त्यांच्या खोलीतून बाहेर आले नाही म्हणून त्यांच्या सहकाऱ्यांनी शोध घेतला. त्यावेळी डॉ.धुमाळ हे त्यांच्या बेडवर मृतावस्थेत पडलेले दिसले. डॉ. धुमाळ यांच्या मृतदेहाजवळ अँटिबायोटिक सलाइन आढळले.

डॉ. धुमाळ हे होस्टेलच्या पाचव्या मजल्यावर राहत होते. काही दिवसांपूर्वीच ते १० दिवसांची रजा घेऊन परतले होते. मात्र, ताप आल्याने त्यांनी हॉस्टेलवरच उपचार घेण्यास सुरुवात केली. ते अँटिबायोटिक घेत असल्याची सांगण्यात येत आहे.

सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. धुमाळ हे अतिशय गुणी विद्यार्थी होते. इतर विद्यार्थ्यांना ते सहकार्य करायचे. त्यांच्या शरीरावर रॅश आल्याचे दिसून आले. औषधाचे दुष्पपरिणाम शरीरावर रॅश येतात. शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह त्यांच्या कुटुंबांना सोपविण्यात आला. सायन पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली.

IPL_Entry_Point

विभाग