
Mumbai electrocuted news: मुंबईच्या गोरेगाव परिसरात धक्कादायक घटना घडली. क्रिकेट खेळताना वीजेचा शॉक लागून १० वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. ही घटना गोरेगावमधील मीनाताई ठाकरे ग्राऊंड येथे रविवारी घडली. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक तपास करीत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार,आदिल चौधरी असे वीजेचा शॉक लागून मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. आदिल हा इयत्ता पाचवीत शिकत होता. दरम्यान, रविवारी दुपारी ३ वाजता आदिल हा आपल्या मित्रांसोबत मीनाताई ठाकरे मैदानावर क्रिकेट खेळत होता. सामन्यादरम्यान एक चेंडू म्हाडाने बांधलेल्या पोलीस चौकीच्या छतावर गेला. हा चेंडू काढण्याच्या प्रयत्न करत असताना तो वीजेच्या संपर्कात आला आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यावेळी पोलीस चौकी बंद होती, अशी माहिती समोर आली आहे.
या घटनेची माहिती मिळताच दिंडोशी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जोगेश्वरी पूर्व येथील ट्रॉमा रुग्णालयात पाठवला.शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी दिंडोशी पोलिसांत अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेला कोण जबाबदार आहे आणि कोणाच्या निष्काळजीपणामुळे १० वर्षाच्या मुलाला आपला जीव गमवावा लागला, या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू आहे. दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे दिंडोशी पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
आदिलचे वडील टेम्पो चालक म्हणून काम करतात. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, “आम्ही पंचनामा पूर्ण केला आहे आणि घटनास्थळी कोणतीही तार सापडली नाही. आम्ही घटनेची चौकशी करत आहोत आणि कायद्यानुसार दोषींवर कारवाई केली जाईल.”
कल्याणमधील चिंचपाडा गावात दारूसाठी तीन जणांनी मित्राची हत्या केली. पार्टीत दारु कमी पडल्याने आरोपींनी बर्थडे बॉयला चौथ्या मजल्यावरून खाली फेकले. या घटनेत २५ वा वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाचा मृत्यू झाला.कार्तिक वायाळ असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. कार्तिकने आपल्या वाढदिवस साजरा करण्यासाठी आरोपी निलेश क्षीरसागर, सागर काळे आणि धीरज यादव यांना आपल्या घरी बोलावले. त्यानंतर सगळ्यांनी सोबत पार्टी केली. परंतु, पार्टीत दारु कमी पडल्याने आरोपींनी कार्तिकला सुनावले. मात्र, यामुळे राग अनावर झाल्याने कार्तिकने नीलेशच्या डोक्यात बियरची बॉटल फोडली आणि आपल्या बेडरूमध्ये झोपायला गेला. त्यानंतर संतापलेल्या निलेश, सागर आणि धीरज यांनी त्याच्या खोलीत गेले आणि त्याला बाल्कनीत नेऊन चौथ्या मजल्यावरून खाली फेकले, अशी माहिती पोलीस तपासात उघड झाली.
संबंधित बातम्या
