मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Abu Salem : मुंबई साखळी बॉम्ब स्फोटाप्रकरणी अबू सालेमला मुंबईसत्र न्यायालयाचा दिलासा; शिक्षेचा 'तो' कालावधी करणार माफ

Abu Salem : मुंबई साखळी बॉम्ब स्फोटाप्रकरणी अबू सालेमला मुंबईसत्र न्यायालयाचा दिलासा; शिक्षेचा 'तो' कालावधी करणार माफ

Jun 30, 2024 11:20 AM IST

Abu Salem news : मुंबई साखळी बॉम्बस्फोटाप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने गुंड अबू सालेमला दिलासा दिला. अटक झाल्यापासून शिक्षा होईपर्यंतचा कालावधी शिक्षेतून माफ केला जाणार आहे.

मुंबई साखळी बॉम्ब स्फोटाप्रकरणी अबू सालेमला मुंबईसत्र न्यायालयाचा दिलासा; शिक्षेचा 'तो' कालावधी करणार माफ
मुंबई साखळी बॉम्ब स्फोटाप्रकरणी अबू सालेमला मुंबईसत्र न्यायालयाचा दिलासा; शिक्षेचा 'तो' कालावधी करणार माफ

Abu Salem news : १९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटा प्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या गुंड अबू सालेमला शनिवारी विशेष सत्र न्यायालयाने दिलासा दिला आहे. अटक झाल्यापासूनचा शिक्षा होईपर्यंतचा १२ वर्षांचा कालावधी शिक्षेतून माफ करण्याची मागणी टाडा न्यायालयाने मान्य केली आहे.

१९९३ मध्ये मुंबईमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाले होते. या बॉम्बस्फोटात अबू सालेम दोषी होता. तो फरार होता. दरम्यान, २००५ मध्ये त्याला पोर्तुगाल सरकारने भारताच्या ताब्यात दिले होते. त्यानंतर, त्याच्यावर या प्रकरणी खटला चालवण्यात आला होता. सालेम हा मुंबई साखळी बॉम्बस्फोटाप्रकरणी दोषी आढळला होता. त्याला २०१७ मध्ये विशेष टाडा न्ययालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. या प्रकरणी सध्या तो मुंबईच्या तळोजा कारागृहात शिक्षा भोगत आहे. या कारागृहातून त्याला इतरत्र हलवण्यात येऊ नये अशी मागणी त्याने कोर्टात केली होती. मात्र, ही मागणी कोर्टाने फेटाळली होती. तसेच सालेम याने त्याला ११ नोव्हेंबर २००५ ला अटक करण्यात आली होती. तर त्याला ७ सप्टेंबर २०१७ ल शिक्षा सुनावण्यात आली होती. या दरम्यान, तब्बल १२ वर्ष सालेम हा तुरूगांत होता.

ट्रेंडिंग न्यूज

त्यामुळे त्याने ट्याच्या शिक्षेतून हा कालावधी कमी करण्याची मागणी केली होती. या साठी त्याने न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्याच्या याचिकेवर न्यायाधीश बी. डी. शेळके यांनी शनिवारी निर्णय देत त्याची मागणी मान्य केली. बांधकाम व्यावसायिक प्रदीप जैन यांच्या हत्येप्रकरणीही देखील सालेमला २०१५ मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या प्रकरणात देखील त्याचा अटकेपासून शिक्षा होईपर्यंतचा १० वर्षांचा कारागृहात घालवलेला कालावधी माफ करण्यात आला होता. मुंबई बॉम्बस्फोटा प्रकरणी देखील अटक झाल्यापासून शिक्षा होईपर्यंत कारागृहात घालवलेला कालावधी माफ करण्याची मागणी त्याने केली होती. या साठी त्याने आधीच्या शिक्षेतून कमी केल्याचा कालावधीचा दाखला दिल होता.

न्यायालयाने दोन्ही प्रकरणात त्याने दोन्ही प्रकरणात एकत्र शिक्षा एकत्र भोगण्याचे स्पष्ट केले. तसेच प्रत्यापर्ण करारात त्याच्यावर अतिरिक्त गुन्हे चालवले जाणार नसल्याचे मान्य केले गेले होते. तसेच २५ वर्षांपेक्षा जास्त कालावधी पेक्षा शिक्षा दिली जाणार नाही, असे देखील मान्य करण्यात आले होते. पोर्तुगीज कायद्यानुसार आपण माफीसाठी पात्र असल्याचा दावाही सालेमने केला होता. मात्र, कारागृह प्रशासनाने हा कालावधी शिक्षेतून माफ करण्यास नकार दिला होता. यामुळे त्याने न्यायालयात धाव घेतली होती.

WhatsApp channel
विभाग