मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Bomb Blast : मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील दोषी आरोपीचा तुरुंगात खून, ५ कैद्यांनी बेदम मारहाण करून केली हत्या

Mumbai Bomb Blast : मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील दोषी आरोपीचा तुरुंगात खून, ५ कैद्यांनी बेदम मारहाण करून केली हत्या

Jun 03, 2024 07:38 AM IST

mumbai serial blast convict munna murdered in jail : मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील दोषी असलेल्या एका आरोपीची कोल्हापूरच्या कळंबा कारागृहात बेदम मारहाण करून हत्या करण्यात आली. पाच कैद्यांवर त्याच्या हत्येचा आरोप आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्याची लोखंडी जाळीने हत्या करण्यात आली.

मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील दोषी असलेल्या एका आरोपीची कोल्हापूरच्या कळंबा कारागृहात बेदम मारहाण करून हत्या करण्यात आली.
मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील दोषी असलेल्या एका आरोपीची कोल्हापूरच्या कळंबा कारागृहात बेदम मारहाण करून हत्या करण्यात आली.

mumbai serial blast convict munna murdered in jail : १९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील एका दोषी असलेल्या एका आरोपीची कोल्हापूरच्या कळंबा कारागृहात बेदम मारहाण करून हत्या करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद अली खान उर्फ ​​मुन्ना (वय ५९) असे आरोपीचे नाव असून जेलमधील इतर पाच कैद्यांनी काँक्रीटच्या ड्रेनेज चेंबरच्या झाकणाने लोखंडी सळईणे मारहाण केली. रविवारी सकाळी आठच्या सुमारास आंघोळीच्या हौदावर ही घटना घडली. यात गंभीर जखमी झाल्याने मुन्नाचा जागीच मृत्यू झाला. मुन्नाने स्वतःचे नाव मनोज कुमार भवरलाल गुप्ता देखील ठेवले होते.

ट्रेंडिंग न्यूज

Maharashtra Weather Update : वाढत्या उष्णतेपासून दिलासा मिळणार! राज्यात 'या' जिल्ह्यात पावसाची शक्यता

याप्रकरणी कारागृहातील न्यायालयीन बंदी प्रतीक उर्फ पिल्या सुरेश पाटील, दीपक नेताजी खोत, संदीप शंकर चव्हाण, ऋतुराज विनायक इनामदार आणि सौरभ विकास सिद्ध या पाच जणांची चौकशी जुना राजवाडा पोलिसांकडून करण्यात येत आहे.

Pune Accident : पुण्यात भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक! ६ वर्षाच्या मुलासह दोन जणांचा मृत्यू

महाराष्ट्र कारागृहाच्या डीआयजी स्वाती साठे यांनी दिलेल्या माहितीनुसार मुन्ना उर्फ ​​मोहम्मद अली खान यांचा जेल मधील अंघोळीच्या हौद येथे आंघोळ करण्यावरून इतर कैद्यांशी वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. या हाणामारीत इतर पाच कैद्यांनी त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला. मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या साखळी बॉम्ब स्फोटातील आरोपी मोहम्मद अली खान हा कळंबा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. न्यायालयीन बंदी प्रतीक पाटील, दीपक खोत, संदीप चव्हाण, ऋतुराज इनामदार आणि सौरभ सिद्ध यांनी ड्रेनेजवरील लोखंडी झाकण काढून खान याच्या डोक्यात घातले. हा घाव वर्मी लागल्याने मुन्ना खान याकहा जागेवरच मृत्यू झाला. त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मुन्नाला मृत घोषित केले. याप्रकरणी कोल्हापूर पोलिसांनी पाच जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. त्याला लवकरच अटक करण्यात येईल, असे अधिकाऱ्याने सांगितले.

Amul Hikes Milk Price: अमूल दुधाच्या दरात वाढ, सोमवारपासून द्यावे लागणार इतके पैसे!

हल्लेखोर कैदी आणि मुन्ना यांच्यात बऱ्याच दिवसांपासून तणाव सुरू होता, असे प्राथमिक तपासात समोर आले आहे. मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील चार दोषी कळंबा कारागृहात आहेत. त्यांच्या सुरक्षेसाठी त्यांना सामान्य कैद्यांपासून वेगळे ठेवण्यात येणार आहे. आवश्यकता भासल्यास उर्वरित दोषींना अन्य कारागृहात हलवण्यात येईल, असे साठे यांनी सांगितले.

मुन्ना १९९३ मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी

१२ मार्च १९९३ रोजी मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात २५७ लोक मारले गेले होते तर १००० हून अधिक जखमी झाले होते. या प्रकरणी मुन्ना दोषी आढळला होता. त्यांना आजन्म कारावासाची शिक्षा देण्यात आली होती. त्यानंतर मुन्नाला २०१३ मध्ये कळंबा कारागृहात आणण्यात आले होते. त्याने १४ वर्षांची शिक्षा पूर्ण केली होती तर तो काही काळ तुरुंगाबाहेर होता. मात्र, नंतर सुप्रीम कोर्टाने त्याची शिक्षा जन्मठेपेत बदलवली. टायगर मेमनने आरडीएक्स आणि शस्त्रास्त्रे मुंबईहून रायगडला नेण्यात मदत केल्याचा आरोप मुन्नावर होता.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग