मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai: दारुच्या नशेत प्रेयसीनं केलं असं काही, संतापलेल्या प्रियकरानं घेतला तिचा जीव; मुंबई येथील घटना

Mumbai: दारुच्या नशेत प्रेयसीनं केलं असं काही, संतापलेल्या प्रियकरानं घेतला तिचा जीव; मुंबई येथील घटना

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Apr 16, 2024 04:20 PM IST

Kandivali Security Guard Kills Girlfriend: मुंबई येथील कांदिवली परिसरात किरकोळ वादातून सुरक्षा रक्षकाने प्रेयसीची हत्या केली.

मुंबईच्या कांदिवली येथे सुरक्षारक्षकाने प्रेयसीची हत्या केली.
मुंबईच्या कांदिवली येथे सुरक्षारक्षकाने प्रेयसीची हत्या केली.

Mumbai News: मुंबईच्या कांदिवली पूर्वेकडील एका इमारतीतील २७ वर्षीय सुरक्षा रक्षकाला समता नगर पोलिसांनी प्रेयसीची हत्या केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. डंबर बहादूर असे आरोपीचे नाव असून त्याची सहा महिन्यांपूर्वी केअरटेकर हेमकुमारी भट्ट (वय, ३०) हिच्याशी ओळख झाली. नेपाळचे असल्याने दोघांमध्ये मैत्री झाली. दोघांमध्ये प्रेमसंबंध होते आणि ते सहसा सुरक्षा रक्षकाच्या केबिनमध्ये एकमेकांना भेटत

ट्रेंडिंग न्यूज

Pune girl rape : पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणीवर बलात्कार; पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री एकमेकांना भेटल्यानंतर दोघांनीही मद्यपान केले. यानंतर मृत तरुणी आपले दोन लग्न मोडल्यांचा विचार करून भावूक झाली आणि स्वत:चे डोके भिंतीवर आपटण्यास सुरुवात केली. यावेळी आरोपीने तिला थांबवण्याचा प्रयत्न केला. पण तिने आरोपीला ढकलले. यावर तो चिडला आणि तिचे भिंतीवर जोरात डोके आपटले. रविवारी सकाळी तरुणीला जाग न आल्याने आरोपीने सोसायटीच्या सदस्यांना बोलावून रुग्णालयात नेले असता तेथे तिला मृत घोषित करण्यात आले.

Pune Crime : पुण्यात सट्टेबाजांवर मोठी कारवाई! कोथरुडमध्ये आयपीएलवर सट्टा खेळणाऱ्या १० जणांना अटक

समता नगर पोलिस ठाण्यातील एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, महिलेला रक्तस्राव झाला नव्हता, ज्यामुळे सोसायटीच्या सदस्यांनी ती बेशुद्ध असल्याचा अंदाज व्यक्त केला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीची चौकशी केली. यानंतर आरोपीने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. समता नगर पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपीने दिलेले कारण खरे आहे की, हत्येमागे अन्य काही कारण आहे, याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.

बारामती: शेतकऱ्याची कॅमेऱ्यासमोर आत्महत्या

बारामती येथील लाटे गावातील एका शेतकऱ्याने कॅमेऱ्यासमोर आत्महत्या केली. हनुमंत सणस असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. हनुमंत सणस यांनी संबंधित शेतकऱ्याने पाटबंधारे विभाग महावितरण विभाग आणि पोलिसांना यांच्यावर गंभीर आरोप करत विष प्राशन केले. याप्रकरणी हनुमंत सरण यांच्या थोरल्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्महत्यापूर्वी हनुमंत सणस यांनी फेब्रुवारी महिन्यात मुख्यमंत्री कार्यालयासह उपमुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांसह संबंधित कार्यालयांना निवेदन पाठवले. ज्यात सणस यांनी न्याय न मिळल्यास आत्महत्येचा इशारा दिला होता.

IPL_Entry_Point

विभाग