मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Retired Cop's Son Assaulted: मुंबईच्या धारावीत निवृत्त पोलिसाच्या मुलावर प्राणघातक हल्ला; संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद

Retired Cop's Son Assaulted: मुंबईच्या धारावीत निवृत्त पोलिसाच्या मुलावर प्राणघातक हल्ला; संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Mar 12, 2024 07:02 PM IST

Retired Cop's Son Assaulted In Mumbais Dharavi: मुंबईच्या धारावी परिसरात एका सेवानिवृत्त पोलीस हवालदाराच्या मुलाला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Retired Cop's Son Assaulted CCTV Footage
Retired Cop's Son Assaulted CCTV Footage

Mumbai Dharavi News: मुंबईच्या धारावीत रविवारी (१० फेब्रुवारी २०२४) रात्री धक्कादायक घटना घडली. एका सेवानिवृत्त पोलीस हवालदाराच्या मुलावर पाच जणांच्या टोळक्याने प्राणघातक हल्ला केल्याची माहिती समोर आली.ही घटना धारावी जंक्शनवर झाल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात सेवानिवृत्त पोलीस हवालदाराचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. त्याला तातडीने स्थानिक रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी नेण्यात आले. ही घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ज्यात दिसत आहे की, पाच जण संबंधित तरुणाला सुरुवातीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करताना दिसत आहेत. त्यानंतर जवळ असलेली झाडांची कुंडी उचलून त्याच्या डोक्यात टाकतात.

धारावी पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, सेवानिवृत्त पोलिस अधिकाऱ्याच्या मुलावर हल्ला करणाऱ्या पाच जणांचा शोध सुरू आहे. संशयित आरोपी मुंबईतील विशेषत: प्रतीक्षा नगर आणि किडवाई मार्ग येथील रहिवासी आहेत. या पाच जणांविरुद्ध मुंबईतील अनेक पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

मुंबई पोलिसांनी या घटनेचे वर्णन पूर्वनियोजित हल्ला असे केले आहे.सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा मुलगा आणि त्याच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या पाच जणांची सध्या शहरातील विविध पोलीस ठाण्यात चौकशी सुरू आहे.

WhatsApp channel

विभाग