मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Rape: मुंबईतील महिलेवर वारंवार बलात्कार, ब्लॅकमेल करून १२ लाख उकळले, टेनिस प्रशिक्षकाचे धक्कादायक कृत्य!

Mumbai Rape: मुंबईतील महिलेवर वारंवार बलात्कार, ब्लॅकमेल करून १२ लाख उकळले, टेनिस प्रशिक्षकाचे धक्कादायक कृत्य!

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Mar 22, 2024 08:38 AM IST

Tennis Coach Booked for Raping Woman: मुंबईत एका महिलेने आपल्या टेनिस प्रशिक्षकाविरोधात बलात्कार, मारहाण, खंडणी आणि छळाची तक्रार दाखल केली आहे.

मुंबईतील महिलेवर वारंवार बलात्कार करून तिच्याकडून लाखो रुपये उकळल्याप्रकरणी टेनिस प्रशिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
मुंबईतील महिलेवर वारंवार बलात्कार करून तिच्याकडून लाखो रुपये उकळल्याप्रकरणी टेनिस प्रशिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Mumbai Rape News: मुंबईतील एका ४० वर्षीय महिलेवर वारंवार बलात्कार आणि मारहाण केल्याप्रकरणी टेनिस प्रशिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच आरोपीने पीडित महिलेला धमकावून तिच्याकडून १२ लाख रुपये उकळले असल्याचे पोलीस तक्रारीत म्हटले आहे. आरोपीच्या सततच्या छळाला आणि धमक्यांना कंटाळून महिलेने अनेकदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पीडित महिलेच्या तक्रारीवरून लोणावळा शहर पोलिसांनी बुधवारी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडिता जुलै २०२२ मध्ये पवईतील हिरानंदानी येथील एका स्पोर्ट्स क्लबमध्ये रुजू झाली. जिथे ती आरोपी टेनिस प्रशिक्षकाला भेटली होती. त्याचवर्षी ऑक्टोबर महिन्यात आरोपीने तिला टेनिस स्पर्धेसाठी पुण्यात येण्यास सांगितले. त्यानंतर लोणावळ्यातील एका रिसॉर्टमध्ये तिच्यावर बलात्कार केला.

'लोणावळ्यातील घटनेपूर्वी आरोपीकडून अयोग्य वर्तन झाल्याच्या घटना घडल्या होत्या. आरोपीने एकदा फक्त बॉक्सर परिधान करून पीडितेला कॉल केला आणि प्रपोज केला. टेनिस कोर्टवरही तो पीडिताला स्पर्श करायचा, असेही महिलेने सांगितले आहे.

आपल्या आजारी मुलीला पाहण्यासाठी कोच तिच्या घरी गेल्याचा एक किस्साही महिलेने सांगितला. त्यावेळी कुटुंबातील इतर सदस्य जवळ नसल्याने त्याने तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला, मात्र, तिने त्याला घराबाहेर काढले. स्पर्धेसाठी पुण्याला जात असताना आम्ही लोणावळ्यातील एका लॉजवर थांबलो. परंतु,आपल्या खोलीतील बाथरूम स्वच्छ नसल्याचे सांगितल्याने तो बाथरूम वापरण्यासाठी माझ्या खोलीत शिरला, असे फिर्यादीत म्हटले. पुढील दोन दिवस त्याने पीडितावर बलात्कार केला. तसेच या घटनेबाबत कुठेही वाच्यता करू नकोस, अशी धमकी दिली.

Malad public toilet News: मालाडमध्ये सार्वजनिक शौचालयाच्या गटारात पडून दोघांचा मृत्यू, एक जण जखमी

यानंतर आरोपीने तिला इतर लॉजमध्ये नेले आणि त्यानंतर तिच्यावर अनेकदा बलात्कार केला आणि तिच्याकडून पैसेही उकळले. मे २०२३ मध्ये तो गर्भपात करण्यासाठी तिला रुग्णालयात घेऊन गेला, असेही फिर्यादीत म्हटले आहे. आरोपीने पीडिताच्या पतीसमोर प्रेमसंबंध म्हणून मांडण्याची धमकी दिल्याने महिलेने अनेकवेळा आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे समजत आहे.

याप्रकरणी आरोपीविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ (बलात्कार), ३७६ (२) (एन) (एकाच महिलेवर वारंवार बलात्कार), ३५४ (महिलेचा विनयभंग करण्यासाठी हल्ला किंवा गुन्हेगारी बळाचा वापर), ४५२ (चुकीच्या पद्धतीने रोखणे), ३१२ (गर्भपात करणे), ३२३ (स्वेच्छेने इजा पोहोचविणे), ५०४ (सार्वजनिक शांतता भंग करण्याच्या हेतूने हेतुपुरस्सर अपमान करणे) आणि ५०६ (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

IPL_Entry_Point

विभाग