मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Rape: चॉकलेटचं आमिष दाखवत ४ वर्षांच्या विद्यार्थिनीवर अत्याचार; शाळेतील सुरक्षा रक्षकाला अटक

Mumbai Rape: चॉकलेटचं आमिष दाखवत ४ वर्षांच्या विद्यार्थिनीवर अत्याचार; शाळेतील सुरक्षा रक्षकाला अटक

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Feb 05, 2024 01:04 PM IST

Mumbai School Watchman Rapes 4 year Old Student: मुंबई येथील कांदिवली परिसरात एका सेक्युरिटी गार्डने चार वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार केला.

Mumbai Rape
Mumbai Rape (HT_PRINT)

Mumbai School Girl Rape: मुंबईत चार वर्षाच्या मुलीला मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी शाळेतील सुरक्षा रक्षकाला समता पोलिसांनी शनिवारी अटक केली. कांदिवली पूर्व मधील अशोक नगर येथील शाळेत हा प्रकार शुक्रवारी घडला. पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून समता नगर पोलिसांनी पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलिसांनी पुढील कारवाईला सुरुवात केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सुरक्षा रक्षकाने पीडित मुलीला चॉकलेट देण्याचे आमिष दाखवत वॉशरुममध्ये नेत तिच्यावर बलात्कार केला. पीडिताच्या आईने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, पीडित मुलगी शुक्रवारी शाळेतून परतली, तेव्हा तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये वेदना होऊ लागल्या. त्यावेळी आईने मुलीला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता पीडिताने तिच्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार तिच्या आईला सांगितला.

त्यानंतर पीडिताच्या आईने त्वरीत समता नगर पोलीस ठाणे गाठून सुरक्षा रक्षकाविरोधात तक्रार दाखल केली. पीडिताला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले असता तिच्यावर शारिरीक अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाले. यानंतर पोलिसांनी पीडिताला आरोपीची ओळख पटवण्यासाठी शाळेत नेले. पीडिताने आरोपीला ओळखताच त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

WhatsApp channel

विभाग