मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Rape: मुंबई हादरली! वरळीत २० महिन्यांच्या चिमुकलीवर अत्याचार; शेजारी राहणाऱ्या आरोपीला अटक

Mumbai Rape: मुंबई हादरली! वरळीत २० महिन्यांच्या चिमुकलीवर अत्याचार; शेजारी राहणाऱ्या आरोपीला अटक

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Jan 23, 2023 04:51 PM IST

Worli Rape: मुंबईच्या वरळी परिसरात २० महिन्यांच्या चिमुकलीवर अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी शेजारी राहणाऱ्या ३५ वर्षीय आरोपीला अटक केली आहे.

Mumbai Rape
Mumbai Rape (HT_PRINT)

Mumbai Rape: मुंबईच्या वरळी परिसरात अवघ्या २० महिन्यांच्या चिमुकलीवर अत्याचार केल्याप्रकरणी वरळी पोलिसांनी शेजारी राहणाऱ्या ३५ वर्षीय व्यक्तीला अटक केली. औषधोपचारानंतरही पीडित मुलीचा त्रास कमी न झाल्यामुळे आईने तपासणी केली असता हा प्रकार उघड झाला. त्यानंतर पीडिताच्या आईनी ताबडतोब वरळी पोलिसांत धाव घेऊन आरोपीविरोधात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित मुलगी दोघेही एकाच परिसरात राहतात. पीडिताची आई काही काळासाठी घराबाहेर गेली होती. त्यावेळी आरोपीने तिला घरात एकटी पाहून स्वत:च्या घेऊन गेला. तिथेच त्याने पीडितावर अत्याचार केले. त्यानंतर त्याने पुन्हा मुलीला तिच्या घराबाहेर सोडलं. पण घरी आल्यानंतर मुलगी खूप रडत होती. पीडिताच्या आईला वेळगाच संशय आल्याने ती मुलीला घेऊन जवळच्या रुग्णालयात गेली. त्यानंतर डॉक्टरांनी तिची तपासणी केली असता तिच्यावर अत्याचार झाल्याचे उघडकीस आले. मुलीच्या आईनं तात्काळ पोलीस स्थानक गाठलं आणि आरोपींविरोधात तक्रार दाखल केली.

याप्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ (बलात्कार) आणि लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण (पॉक्सो) कायद्याच्या संबंधित तरतुदींनुसार आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला. या घनटेने आजुबाजूच्या परिसरात एकच खळबळ माजली आहे.

IPL_Entry_Point

विभाग