
मुंबई: मुंबईतील दादर पूर्व भागातील रेनट्री नामक १५ मजली रहिवाशी इमारतीच्या १३ व्या मजल्यावर भीषण आग लागली. या आगीत एका वृद्ध नगरिकाचा गुदमरून मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी ९ च्या सुमारास घडली.
डॉ. सचिन पाटकर (वय ६०) असे या आगीत मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकाचे नाव आहे. पाटणकर हे मानसोपचारतज्ञ होते. त्यांच्यासोबत राहणाऱ्या दोघांना वाचवण्यास यश आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मुंबईच्या दादर पूर्व भागात रेनट्री नामक १५ मजली रहिवाशी इमारत आहे. या इमारतीच्या १३ व्या मजल्यावर अचानक आग लागली. आगीने काही वेळातच भीषण रूप धारण केले. आगीचे लोळ दुरून दिसत होते. याची माहिती ताबडतोब अग्निशामक दलाला देण्यात आली. अग्निशामक दलाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
त्यांनी १३ व्या मजल्यावर जात आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, दुरामुळे पाटणकर यांचा गुदमरून मृत्यू झाला. कर्मचाऱ्यांनी दोघा व्यक्तींना सुखरूप बाहेर काढले. दरम्यान, ही आग कशामुळे लागली याची माहिती मिळू शकली नाही. अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी इमारतीची आग विरोधी यंत्रणेची पाहणी केली. ती yogy असल्याचे आढळून आले आहे. आगीची माहिती सहायक विभागीय अग्निशमन अधिकारी डी. डी. पाटील दिली आहे.
संबंधित बातम्या
