Mumbai Sea High Tide Low Tide alert : मुंबईत पुढील काही दिवस जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने मुंबईत आज यलो तर पुढील काही दिवस पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पावसासोबतच आता समुद्रात भरती आणि ओहोटी येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मुंबई पालिकेने देखील समुद्रावर जातांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. हवामान विभागाने दिलेल्या महितीनुसार व पालिकेले केलेल्या ट्विट नुसार आज २५ जून रोजी दुपारी समुद्राला भरती ओहोटी येण्याची शक्यता आहे. तर उद्या बुधवारी देखील भरती ओहोटी येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या काळात समुद्रापासून दूर राहावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे.
मुंबईत हवामान विभागाने चांगल्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागाने पालघर, ठाणे, मुंबईला यलो अलर्ट जारी केला आहे. मुंबईत या वर्षी जून महिन्यात पावसाची ४० ते ४५ टक्के तुट आहे. मुंबईत ९ जून रोजी मॉन्सून दाखल होऊनही म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. जून महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, तसे न होता पावसाची तुट नोंदवण्यात आली आहे.
हवामान विभागाने मुंबईत मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला असून उद्या २६ जूननंतर पावसाचा वेग वाढण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने मुंबईत २७ तारखेपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
या दरम्यान, आज आणि उद्या समुद्रात भरती आणि ओहोटी येणार आहे. मुंबईत आज दुपारी समुद्राला भरती येण्याची शक्यता आहे. यावेळी ४.५४ मीटर ऊंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबई पालिकेने या संदर्भात ट्विट करून माहीती दिली आहे.
आज दि २५ जून रोजी अंदाज
भरती- दुपारी - ०२:३६ वाजता - ४.५४ मीटर
ओहोटी - रात्री - ८:४१ वाजता - १.६८ मीटर
२६ जून भरती ओहोटीचा अंदाज
मध्यरात्री - २.५५ वाजता - ३.८४ मीटर
ओहोटी - सकाळी ८:१३ वाजता -०.७७ मीटर
भरती काळात व ओहोटी काळात समुद्रात जाऊ नये असा इशारा देण्यात आला आहे. समुद्र किनाऱ्यावर फिरतांना देखील काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
संबंधित बातम्या